पुणे, 17 ऑगस्ट : राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. अशात कोकण मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्यावर येत्या 48 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, घाट माथा तसंच तळ कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोयना, राधानगरी परिसरात सुरू असलेला पाऊस आणखी दोन दिवस असाच सुरू राहिल अशी माहिती आयएमडीने दिली आहे. तर पुण्यातही घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 21 तारखेपर्यंत कोकण-मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस असणार आहे तर 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रात उत्तम पाऊस होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
सुप्रिया सुळेंना आव्हान देणाऱ्या कांचन कुलांवर नवी जबाबदारी, पुण्यात मिळालंं पद
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातही काही भागात पावसाचा जोर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.
....आणि रागाच्या भरात उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीनेच घेतला दुकानदाराचा चावा!
पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.