Home /News /maharashtra /

VIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं

VIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं

या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील ऊस तोडींवर आणि भाताच्या मळणीवर होणार आहे.

    कोल्हापूर, 19 नोव्हेंबर : कोल्हापूर आणि सांगली जिल्हात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. तसंच या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील ऊस तोडींवर आणि भाताच्या मळणीवर होणार आहे. कोल्हापूर शहराला मध्यरात्री दोन वाजता मुसळधार पावसाने झोडपलं. सुमारे अर्धा तास शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. काल (रविवार) दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. तेव्हापासूनच पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर मध्यरात्री सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. शहरासह जिल्ह्यातल्या चंदगड, राधानगरी तालुक्यातील काही भागातही पाऊस पडला आहे. या पावसाचा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या ऊस तोडींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातल्याही अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, या पावसाचा मोठा फटका पिकांना बसणार आहे. दरम्यान, आता काही ठिकाणी पाऊस होत असला तरीही महाराष्ट्रातील अनेक भागात यंदा पाऊस रुसलेला पाहायला मिळाला आहे. अनेक भागांत दुष्काळाची भीषण स्थिती आहे. राज्यात यंदा कुठे, किती पाऊस झाला? यंदा राज्यात सरासरी 75 टक्के पाऊस झाला आहे. काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरीही बहुतांश भागांत पाऊस रुसलेलाच पाहायला मिळाला. - सोलापूर जिल्ह्यात फक्त 25 टक्के पाऊस - 13 जिल्ह्यांत 50 टक्के ते 75 टक्के पाऊस - 26 तालुक्यांत फक्त 25 टक्के पाऊस - 139 तालुक्यांत 50 टक्के पाऊस - 180 तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती सरकारकडून दुष्काळाची घोषणा राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर 112 तालुक्यात गंभीर परिस्थिती आणि राज्याच्या 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ज्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आलाय, त्या तालुक्यांतील महसूल वसुली, शेतकऱ्यांचं वीज बिल आणि शैक्षणिक शुल्क वसुलीलाही स्थगिती देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. VIDEO : 'अवनी'चे दोन बछडे कॅमेऱ्यात झाले ट्रॅप
    First published:

    Tags: Kolhaur, Rain, Sangali

    पुढील बातम्या