वादळी वाऱ्यासह बरसला मेघराज..केळीसह उरलीसुरली पिकेही भुईसपाट

वादळी वाऱ्यासह बरसला मेघराज..केळीसह उरलीसुरली पिकेही भुईसपाट

राज्यात पुणे, नाशिक, जळगाव, जालना जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

  • Share this:

मुंबई, 7 जून- राज्यात पुणे, नाशिक, जळगाव, जालना जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. जळगाव जिल्ह्यात केळीसह उरलीसुरली पिकेही भुईसपाट झाली आहेत.

ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास चोपडा, यावल, जळगाव, रावेर आदी तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला. केळीसह उरलीसुरली पिकेही भुईसपाट झाली आहेत. वातावरणात काही काळ यामुळे गारवा निर्माण झाला होता.

रावेर येथे झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तसेच यावल तालुक्यालाही पावसाने चांगलेच झोडपले. हिंगोणा येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गावातील मुख्य बाजारपेठेत विद्युत तारा तुटून पडल्या. तसेच अनेक घरांची पत्रे उडून नुकसान झाले.

जळगाव तालुक्यातील किनोद येथे दुपारी 4 वाजता वादळी वाऱ्यासह, अवकाळी पावसाने झोडपाल्याने शिल्लक केळीही भुईसपाट झाली आहे. गेल्या रविवारी परिसरातच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते. अनेक शेड, पत्रे उडाले होते तसेच जनावरेही जखमी झाले होते. शुक्रवारी पुन्हा अस्मानी आल्याने किनोद परिसरात रविवारी झालेल्या पावसाने शिल्लक केळीही भुईसपाट झाली आहे. त्याच प्रमाणे लागवड झालेल्या कापसाचेही नुकसान झाले आहे. या संकटामुळे शेतकरी पूर्ण नेस्तनाबूत झाल्याचे चित्र आहे.

दौंडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी..

दौंड तालुक्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उष्णतेमुळे हैराण झालेल्या दौंडकरांना सायंकाळी आलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.पाऊस येण्याअगोदर मोठ्या प्रमाणावर वादळी वारे सुटले होते. यानंतर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडागडासह पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या. पावसाची चातका प्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा या आलेल्या पहिल्या पावसामुळे पल्लवित झाल्या आहेत.

मनमाडसह परिसरात गारपीट..

मनमाडसह येवला व नांदगाव तालुक्यातील अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले.काही ठिकाणी गारपिटीही झाली. पावसा सोबत वादळी वारा इतका जोरात होता की त्याने ठिकठिकाणी झाडे जमीनदोस्त केली.अनेक घरांचे छप्पर उडून गेली तर काही घरांची पडझड झाली.येवल्यात कांद्याचे शेड कोसळल्यामुळे त्यातील शेकडो क्विंटल कांदा भिजून खराब झाला.विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला.पाऊस,गारपीट व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी मात्र जीवित हानी कुठेही झालेली नाही.पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे गेल्या 3 महिन्यापासून जीवघेण्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या वर्षीही मनमाडसह या भागात 7 जून रोजी पावसाचे आगमन झाले होते मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती त्यामुळे लोकांना भीषण पाणी टंचाईला तोंड दयावे लागले आज यावर्षी देखील 7 जूनला पावसाने हजेरी लावली मात्र पुन्हा गेल्या वर्षी प्रमाणे पावसाने दडी मारली तर याची चिंता सर्वांना भेडसावत आहे

जालना शहरासह मंठा,अंबडमध्ये मृग नक्षत्र बरसला

गेल्या 5 महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या जालना शहरासह अंबड, मंठा, तालुक्यात मृगच्या पावसाने हाजरी लावलीय, नागरीकांना अचानक बरसलेल्या पावसाने काही प्रमाणात दिलासा दिलाय. जालना शहरातील अंबड चौफुली भागात आज दुपारच्या सुमारास अचानक पाऊस झाला. मंठा शहरात ही वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या अंबड शहरातील पाचोड नाका परिसरात ही पावसाने हाजरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. सकाळपासूनच जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झालं होतं.अखेर दुपारी नंतर शहरासह मंठा, अंबड च्या काही भागात पावसाने हजेरी लावली.

VIDEO:आयारामांची आमच्याकडे लाईन, गिरीश महाजनांचा चव्हाणांवर पलटवार

First published: June 7, 2019, 8:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading