Home /News /maharashtra /

येत्या आठवड्यात राज्यात दमदार पाऊस, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

येत्या आठवड्यात राज्यात दमदार पाऊस, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Weather Updates: येत्या आठवड्यात राज्यात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

    मुंबई, 29 ऑगस्ट: येत्या चार ते पाच दिवसात राज्यात (Maharashtra Rain) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानंतर राज्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. येत्या आठवड्यात परभणीत सोमवारी, ठाण्यात, रायगडमध्ये तसंच, नाशिकमध्ये मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघरला बुधवारीसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. रविवारपासून मंगळवारपर्यंत कोकणात रत्नागिरी येथे काही ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. सिंधुदुर्गात रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी ठाणे, रायगड येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ''काही मांजरी आडव्या आल्या'', नारायण राणेंचा शिवसेनेवर पुन्हा एकदा प्रहार बंगालच्या उपसागरात तयार होण्यारे कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम आणि मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे, महाराष्ट्रात येत्या 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असं ट्विट हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी केलं आहे. बुधवारी पालघरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मंगळवारी आणि बुधवारी मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे येथे बुधवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मंगळवारी नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवारी आणि मंगळवारी जळगावमध्ये, मंगळवारी आणि बुधवारी नंदुरबारमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर फारसा वाढणार नसल्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे विदर्भ क्षेत्रात आठवड्याच्या शेवटी पावसाचा जोर वाढलेला दिसेल. राणे पिता- पुत्रांवर शिवसेनेचा पुन्हा एकदा जोरदार प्रहार आज भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai rain, Rain

    पुढील बातम्या