मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Rain Alert: राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागानं वर्तवला अंदाज

Rain Alert: राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागानं वर्तवला अंदाज

Rain Alert: राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

Rain Alert: राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

Rain Alert: राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु असून बहुतांश जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती ओढावली आहे. अशात आता हवामान विभागानं राज्याला पुढील 4 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 13 ऑगस्ट: राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु असून बहुतांश जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती ओढावली आहे. अशात आता हवामान विभागानं राज्याला पुढील 4 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा (Rain Alert) इशारा दिला आहे. राज्यात पुढचे चार दिवस पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात यलो अलर्ट तर नांदेड जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान या पावसामुळं भंडारदरा धरण भरलं असून धऱणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट-  राज्यात गेल्या दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळं राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख धरणं भरत आलेली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणंही जवळपास पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. दरम्यान हवामान विभागाकडून आज पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या  जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस या चारही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय नांदेड जिल्हामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हेही वाचा- घराबाहेर पडण्याआधी लोकलचं शेड्युल नक्की पाहा नाहीतर होईल नुकसान भंडारदरा धरण भरलं, धरणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा- दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं धरण पूर्ण भरलं आहे. सध्या धरणामध्ये 95 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून वाढत्या पावसाचा जोर पाहता पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बघता सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्याद्वारे 1268 क्युसेक व विद्युत गृहाद्वारे 826 क्युसेक असा एकुण 2044 क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदीपात्रात प्रवाहित केला जात आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्येही वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती अवजारांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
First published:

Tags: Monsoon, Rain

पुढील बातम्या