राज्यात पुढील 24 तासांत पुन्हा मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील 24 तासांत पुन्हा मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज

पुढील 48 तास मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस हा मुंबईसह उपनगरं, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतो, हवामान विभागाचा अंदाज

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर: गणपती विसर्जनादरम्यान पावसाच्या हलक्या सरी असल्या तरी पुन्हा एकदा मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासून पावसानं पुन्हा जोर धरला आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड, उरण, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. तर काही भागांमध्ये काही वेळ थांबून अथवा रिमझिम सरी आहेत. या भागांमध्ये पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गोवा आणि कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे गडचिरोली तालुक्यातील भामरागड इथे 7 वेळा आतापर्यंत पूर आला होता. मात्र काल रात्री उशिरा भामरागडचा पूर ओसरला आहे.

भोपाळमध्ये गणपती विसर्जन करताना बोट उलटली, 13 गणेश भक्तांचा मृत्यू

पर्लकोटा नदीवरील पुरामुळे  भामरागडचा सातव्यांदा संपर्क तुटला होता. त्यामुळे महापुराने उद्ध्वस्त झालेल्या भामरागडवासियांच्या मदतकार्यात अडथळा येत होता. माञ आता पूर ओसरल्याने मदत करणारी पथके तसेच वैद्यकीय पथके भामरागडला पोहोचत आहेत.राज्यात कोल्हापूर, सांगली नंतर पुराचा फटका बसला तो गडचिरोली जिल्ह्याला. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला. आठ दिवस पर्लकोटा आणि पामुलगौतम तसेच इंद्रावती नद्यांच्या पाण्याने या तालुक्याला घेरलं होतं. एकशे पंचवीस गावे संपर्कहीन होऊन वीजपुरवठा आणि मोबाईलसेवाही बंद पडल्यानं नेमक काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सॅटेलाईट फोनचा वापर करावा लागला. पूरामुळे इथलं अर्थकारणच बिघडल असून सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केलीय. आत्तापर्यंत भामरागडमध्ये 7 वेळा पूर आला होता. सातव्यांदा भामरागडचा संपर्क तुटला आहे परत एकदा पर्लकोटा नदीचा पुल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.पाऊस असल्याने मदत कार्य तसेच सर्वेक्षणात अडथळा निर्माण होत असल्याचे तहसिलदार कैलास अंडील यांनी सांगितले.

नांदेडच्या गंगाखेड आंबेसांगवी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाउस सूरू असल्यामुले विषणूपूरी धरणाचा  दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. पाण्याच्या पातळीत  3 फूटा पर्यंत वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

साताऱ्यात राष्ट्रवादीला दुहेरी धक्का, रामराजेंचा शिवसेना प्रवेश निश्चित?

मराठवाड्यात मात्र अद्यापही पावसानं पाठ फिरवली आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि पाणी नसल्यानं गणपती विसर्जनातही विघ्न आलं. त्यामुळे मूर्ती दान करण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं होतं. मराठवाड्यात नद्या आणि विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या डोक वर काढत आहे. एकाबाजूला गडचिरोली, सांगली, कोल्हापूर शहरांमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण केली आहे. तर दुसरीकडे मराठवाडा कोरडा ठाक आहे.गणपती विसर्जनादरम्यान जरी रिमझिम पाऊस असला तरी आता मात्र पावसानं जोर धऱला आहे. पुढील 48 तास मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस हा मुंबईसह उपनगरं, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

VIDEO: पाणवलेल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाला अखेरचा निरोप, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 09:59 AM IST

ताज्या बातम्या