मुंबई,ता.3 जुलै : मुंबईत लोकलच्या सर्व 445 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडीट करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली. या कामासाठी आयआयटीची मदत घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पियूष गोयल यांनी मंगळवारी सायंकाळी अंधेरी स्टेशनवरच्या दुर्घटनाग्रस्त स्थळाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पश्चिम रेल्वेचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या पाच जणांना प्रत्येकी 1 लाखांची मदतही रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली.
रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी 500 अधिकारी झटत आहेत. दिल्ली आणि लखनऊवरूनही अधिकारी बोलावण्यात आले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत रेल्वेसेवा सुरळीत होईल असं आश्वासनही पियुष गोयल यांनी दिलं.
दुर्घटनाग्रस्त पुलाचं 2017मध्येच ऑडिट करण्यात आलं होतं. या ऑडीटमध्ये काही चुक राहिली का याचाही तपास करण्यात येणार आहे. रेल्वेचे सुरक्षा महानिरिक्षक हे घटनेची चौकशी करून पुढच्या 15 दिवसांमध्ये त्याचा अहवाल देण्यास सांगण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली.
मुंबईच्या देवदुताला रेल्वेचा सलाम, चंद्रशेखर सावंत यांना 5 लाखांचं बक्षीस
मुंबईकरांचा संताप! आधी लोकल नीट करा मग बुलेट ट्रेनचं बघा
चंद्रशेखर सावंतांचा सन्मान
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पण या दरम्यान आपल्या हुशारीने ट्रेन वेळेवर थांबवून मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी हजारो प्रवाशांचे जीव वाचवले.
हजारो मुंबईकरांचा जीव वाचवणारा मोटरमन 'चंद्रशेखर सावंत'
Andheri bridge collapse: प्रवाशांना असाही दिलासा... इंडिगोने देऊ केली मोफत सेवा
त्याबद्दल रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सावंत यांना 5 लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलंय. सकाळची वेळ असल्यामुळे रेल्वेमध्ये खूप गर्दी होती. त्यामुळे चंद्रशेअर यांच्या प्रसंगवाधाने मोठी जीवितहानी टळला असं म्हणायला हरकत नाही. न्यूज 18शी त्यांनी बातचीत केली आणि अपघाताचा संपूर्ण प्रसंग सांगितला.बातम
रेणुका शहाणेला मुंबईची काळजी पण लोकांनी म्हटलं 'काँग्रेसवाली', ट्विटरवर ट्रोल
न्यूज 18लाशी बोलताना चंद्रशेखर सांवत म्हणाले की, 'मी पाहिलं, माझ्यासमोर पुलाचा एक भाग खाली कोसळत होता. केवळ 5 ते 7 सेकंदातच ट्रेन त्या ढिगाऱ्याखाली पोहचत होती. त्यामुळे सगळ्यात आधी मी अर्जंट ब्रेक लावला. या सगळ्याबद्दल माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं. यामुळं हजारो प्रवाशांचे जीव वाचले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andheri, Piyush Goyal, Railway accident, Railway minister