भुसावळात रेल्वे गँगमनचा मर्डर.. बिअर बारमध्ये कटरने गळ्यावर केले वार

पांडुरंग टॉकीजजवळ असलेल्या खान्देश हॉटेलमध्ये काउंटरवर दारू पिताना दोन जणांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून कटरने गळावर वार करून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 09:33 AM IST

भुसावळात रेल्वे गँगमनचा मर्डर.. बिअर बारमध्ये कटरने गळ्यावर केले वार

इम्तियाज अहमद, (प्रतिनिधी)

भुसावळ, 31 ऑगस्ट: पांडुरंग टॉकीजजवळ असलेल्या खान्देश हॉटेलमध्ये काउंटरवर दारू पिताना दोन जणांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून कटरने गळावर वार करून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विकास वासुदेव साबळे (वय 32, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) या तरुणावर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. विकास हा नेपानगर येथे रेल्वेत गँगमन आहे.

ही घटना जामनेर रोडवरील हॉटेल खान्देश परमीट रूम अ‍ॅण्ड बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली. आरोपी नीलेश यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी नीलेश चंद्रकांत ताकदे (वय-26, रा. जुना सातारा, भुसावळ) यासा पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे हा जामनेर रोडवरील खान्देश बिअर बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्ये मद्य प्राशनासाठी बसला होता. तिथे संशयित नीलेश चंद्रकांत ताकदे (वय २६, रा. जुना सातारा, भुसावळ) हा आला व त्याचा विकास याच्याशी वाद झाला. नीलेशने त्याच्याजवळील पेपर कटरने विकासच्या गळ्यावर वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला जळगाव येथे हलविण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार, पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय गुळींग आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. दरम्यान, भुसावळात आठवडाभरातील ही चाकू हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

VIDEO:चिमुरडीचं करणार होता अपहरण, नवी मुंबईकरांनी धु-धु धुतला

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2019 09:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...