सोलापूरच्या बार्शीमध्ये सुरू होणार रेल्वे इंजिनिअरिंग काॅलेज

सोलापूरच्या बार्शीमध्ये सुरू होणार रेल्वे इंजिनिअरिंग काॅलेज

जगभरात ज्या ज्या देशांमध्ये रेल्वेचं मोठं जाळं आहे, तिथे रेल्वे कॉलेजेस आहेत. फक्त भारत याला अपवाद होता

  • Share this:

26 एप्रिल : सोलापूरच्या बार्शीमध्ये येत्या जून महिन्यापासून रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होणार आहे. पुणे एमआयटी आणि रेल्वेचा हा संयुक्त उपक्रम आहे.

या काॅलेजमध्ये विद्यार्थ्यांना अनेक पर्याय असतील. जसं की रेल्वे सिस्टम प्लॅनिंग, रेल्वे पायाभूत सुविधा, रेल्वे ऑपरेशन्स आणि सिस्टम्स इंजीनिअरिंग.

याव्यतिरिक्त सिविल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक हे पर्यायही असणार आहेत. यामागचं प्रमुख कारण असं ही रेल्वेमध्ये आधुनिक तंत्रज्ञाम माहीत असणारे इंजीनिअर्स असावेत आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणाला गती यावी.

जगभरात ज्या ज्या देशांमध्ये रेल्वेचं मोठं जाळं आहे, तिथे रेल्वे कॉलेजेस आहेत. फक्त भारत याला अपवाद होता. त्यामुळेच बार्शीत रेल्वे इंजिनिअरिंग काॅलेज सुरू करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 04:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading