Home /News /maharashtra /

दानवे लागले कामाला, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शिफ्टबाबत केली मोठी घोषणा

दानवे लागले कामाला, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शिफ्टबाबत केली मोठी घोषणा

'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर 18-18 तास काम करू शकतात तर मग आमच्या सारख्या मंत्र्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त काम केलं पाहिजे'

जालना, 10 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात (Union Cabinet reshuffle) कोळसा व रेल्वे मंत्रालयाचा पदभार मिळालेल्या राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आता चांगलेच कामाला लागले आहे. पदभार हाती घेतल्यानंतर रेल्वेतील कर्मचारी (Railway workers timetable) आता ऑन ड्युटी 24 तास राहणार, अशी घोषणाच दानवेंनी केली आहे. रावसाहेब दानवे यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार घेताच आपल्या कामाची चुणूक दाखविण्यास सुरवात केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर 18-18 तास काम करू शकतात तर मग आमच्या सारख्या मंत्र्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त काम केलं पाहिजे. रेल्वेतील सर्व कर्मचारी मग ते मोटरमन असतील, टीसी असतील किंवा रेल्वे मास्तर असतील आता सर्वजण 24 तास काम करतील, असं म्हणत नवीन घोषणाच दानवेंनी केली आहे.

आभाळा आता तरी कोसळ रे, पिकं न उगवल्यामुळे शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

तसंच, रेल्वे मंत्रालय देखील 2 सत्रात सुरू ठेवण्यात येईल.  पहिला सत्र सकाळी 7 ते 4 तर दुसरा सत्र दुपारी 4 ते रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्यात येईल. ज्यामुळे जनतेच्या अडीअडचणी तात्काळ सोडविण्यात मदत होईल, अशी घोषणा दानवे यांनी केली.

याला करंट लागला की काय! युवकाचा नूडल्स बनवतानाचा VIDEO पाहून नाही आवरणार हसू

दोन दिवसांपूर्वीच दानवे यांनी मुंबईची लोकल सुरू करण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. 'कोरोनामुळे मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी बंद आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल सेवा सुरू आहे. राज्याला कोरोनाची परिस्थिती माहिती आहे. जर लोकल सेवा सुरू करायची असेल तर त्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे आहे, त्यांनी जर आमच्याकडे पत्रव्यवहार करून विनंती केली तर लगेच लोकल सेवा सुरू करू शकतो, असं दानवे यांनी सांगितलं. तसंच, 'लोकल सेवा कधी सुरू करावी याबद्दल राज्य सरकारने केंद्राकडे माहिती द्यावी, असंही दानवे म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Mumbai local, Raosaheb Danve

पुढील बातम्या