मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /"तळीये ग्रामस्थांनी काळजी करू नये, सरकार सर्व मदत करेल" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"तळीये ग्रामस्थांनी काळजी करू नये, सरकार सर्व मदत करेल" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray visited Taliye landslide area: तळीये येथे झालेल्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.

CM Uddhav Thackeray visited Taliye landslide area: तळीये येथे झालेल्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.

CM Uddhav Thackeray visited Taliye landslide area: तळीये येथे झालेल्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.

महाड, 24 जुलै : रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर (Extreme heavy rainfall) दरड कोसळून मोठी दुर्घटना (landslide) घडली. रायगड जिल्ह्यातील महाड जवळ असलेल्या तळीये या गावातील 35 घरांवर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. तर अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घटनास्थळाचा पाहणी दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे, अनपेक्षित दुर्घटना घडत आहेत. यातून आपल्याला शिकण्याची गरज आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते. तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू. अशा घटना पाहता डोंगर उतार आणि कडे- कपाऱ्यात राहणाऱ्या वाड्या- वस्त्या यांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात येईल.

रायगडमधील दरड कोसळतानाचा LIVE VIDEO

मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा नद्यांचे पाणी पावसाळयात वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात काहीतरी मार्ग काढण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने जल आराखडा तयार केला जाईल.

ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला त्याठिकाणी पोहताना जवानांना आणि पथकाला अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचाव कार्य करायचे होते. राज्य शासन आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तयार होते. केंद्राने देखील सहाय्य केले, लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Raigad, Uddhav thackeray