सकारात्मक बातमी : ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णावर यशस्वी उपचार

सकारात्मक बातमी : ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णावर यशस्वी उपचार

उपचाराकरीता मुंबईला पाठवण्याऐवजी तिच्यावर महाडमध्येच उपचार करण्याचा निर्णय महाडच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी घेतला.

  • Share this:

रायगड, 24 मे : सर्वत्र कोरोनाची दहशत आणि भीतीचे वातावरण असताना रायगड जिल्ह्यातील महाडमधून एक सकारात्मक बातमी आहे. महाडच्या शासकीय रुग्णालयामध्ये एका कोरोनाग्रस्त परिचारीका रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. महाडसारख्या ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करुन तीचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर या परिचारीकेला आज डिचार्ज करण्यात आला.

महाड प्रेस असोसिएशन आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी वृंदाने पुष्पवृष्टी, ओवाळणी करीत या परिचारीकेचे स्वागत केले. महाडमधील कोकरे गावात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णावर या परिचारीकेने उपचार केले होते. त्यानंतर तीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. उपचाराकरीता मुंबईला पाठवण्याऐवजी तिच्यावर महाडमध्येच उपचार करण्याचा निर्णय महाडच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी घेतला आणि तिला कोरोनामुक्त केले.

छोट्या शहरांमधून कोरोनावर उपचारासाठी रूग्ण मोठ्या शहरांमध्ये नेले जात असताना ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयामध्ये बरी झालेली हा पहिलाच रुग्ण आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली

राज्यात आज 3041 रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 50 हजार 231 एवढी झाली आहे. तर आज 58 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत 1635 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत 14 हजार 600 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 542 वर गेली आहे. त्यामुळे सरकारला चिंता असून ही वाढ रोखण्यावर सरकारने सगळं लक्ष केंद्रीत केलं आहे. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 127 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 2018 इतकी झाली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 24, 2020, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading