रायगड लोकसभा निवडणूक : अनंत गीते VS सुनील तटकरे, झेंडा कुणाचा?

रायगड लोकसभा निवडणूक : अनंत गीते VS सुनील तटकरे, झेंडा कुणाचा?

लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात शिवसेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात चुरशीची लढत आहे. इथे विद्यमान खासदार अनंत गीते आपली जागा राखणार का, याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

  • Share this:

रायगड, 11 मे : लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात शिवसेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात चुरशीची लढत आहे. इथे विद्यमान खासदार अनंत गीते आपली जागा राखणार का, याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

रायगडच्या जागेवर मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचं वर्चस्व होतं. 2009 आणि 2014 मध्ये अनंत गीतेंचा विजय झाला होता. अनंत गीते हे मोदी सरकारमध्ये मंत्रीही होते. शिवसेनेने पुन्हा एकदा या मतदारसंघात त्यांच्यावर भिस्त ठेवली आहे.

2014 मध्येही चुरस

2014 मध्येही अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्या कडवी लढत पाहायला मिळाली होती. अनंत गीतेंना 3 लाख 96 हजार 178 मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंना 3 लाख 94 हजार 68 मतं मिळाली. केवळ 2 हजार मतांच्या फरकाने अनंत गीते जिंकले होते. त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर शेकाप होती. या निवडणुकीत शेकापने काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याचा फायदा आघाडीला होईल, असं बोललं जात आहे.

2009 मध्ये अंतुलेंचा पराभव

2009 मध्ये शिवसेनेच्या अनंत गीतेंनी इथे काँग्रेसच्या ए.आर. अंतुलेंचा दणदणीत पराभव केला होता. त्यानंतर अनंत गीतेंचं या मतदारसंघावर वर्चस्व होतं. रायगड लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या सगळ्या मतदारसंघांत या दोन्ही उमेदवारांचा कसा प्रतिसाद मिळतो ते 23 मे ला कळेल.

चौथ्या टप्प्यात मतदान

रायगडमध्ये चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. रायगड मतदारसंघ हा रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग हा मतदारसंघ रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये विभागलेला आहे.

=============================================================================

निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: May 13, 2019, 3:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading