• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Raigad landslide : पोलादपूरमध्ये दोन गावात भुस्खलन, 11 जणांचा मृत्यू

Raigad landslide : पोलादपूरमध्ये दोन गावात भुस्खलन, 11 जणांचा मृत्यू

दोन्ही पुल कोसळले असल्यामुळे स्थानिक स्वयंसेवकांनी शिड्यांचे स्ट्रेचर बनवून त्याद्वारे जखमींना पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले आहे.

  • Share this:
रायगड, 23 जुलै : रायगडमध्ये (raigad rain) पावसामुळे हाहाकार उडाला आहे.  पोलादपूर (poladpur) तालुक्यातील साखर सुतारवाडी (sutarwadi) आणि केवनाळे (kewnale) गावात भुस्खलन होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत एक 9 वर्षांची मुलगी अजूनही बेपत्ता आहे. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे गावात भुस्खलनहोऊन अनेक लोक ढिगाराखाली अडकले होते. उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचावकार्याअंती 11 लोक मृत झाल्याचे समोर आले आहे. तर 28 लोक जखमी झाले आहेत. साखर सुतारवाडी येथून पाच तर केवनाळेयेथील सर्व पाचही मृतांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काडण्यात यश आले आहे. बंदुकीचा धाक दाखवून बेदम मारहाण, 2 लाख लुटले, विरारमधील घटना LIVE VIDEO तर साखर सुतारवाडी येथील एक 9 वर्षाची मुलगी अजूनही बेपत्ता आहे. साखर सुतारवाडी येथे जाणार्‍या दोन्ही पुल कोसळले असल्यामुळे स्थानिक स्वयंसेवकांनी शिड्यांचे स्ट्रेचर बनवून त्याद्वारे जखमींना पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले आहे. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पोलादपूर येथे पाठविण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना एजीजीएम हॉस्पिटल पनवेल येथे पाठविण्यात आले आहे. राज कुंद्राच्या व्यवसायाशी शिल्पाचा काहीच संबंध नाही? क्राइम ब्रँचची कसून चौकशी दरम्यान, महाडमध्ये मुसळधार पावसात मोठी दुर्घटना (mahad) घडली . तळीये गावावर दरड कोसळली. तब्बल 35 घरांवर ही दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू (38 people died due to landslide) झाला आहे. अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात  आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा तर, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड कोसळण्याच्या झालेल्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त करून अशा प्रकारे डोंगर उतारांवरील गावे व वस्त्या येथील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.  पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन प्रशासन आणि नागरीक यांनी दक्षता घ्यावी तसेच समन्वयाने यंत्रणांनी काम करावे, असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
Published by:sachin Salve
First published: