Home /News /maharashtra /

किल्ले रायगड प्लास्टिकमुक्त होण्याच्या मार्गावर

किल्ले रायगड प्लास्टिकमुक्त होण्याच्या मार्गावर

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रोपवे व्यवस्थापनाने यासाठी कंबर कसली आहे. प्लास्टिक बॉटल किंवा कचरा गडावरती जाऊ नये याकरीता खास व्यवस्था करणेत आली आहे. गडावरील रोपवे स्टेशननंतर बॅरीकेड्स बसवून प्रत्येक शिवप्रेमी पर्यटकांना प्लास्टिक न घेऊन जाण्याची विनंती करत तपासणी केली जाते.

पुढे वाचा ...
31 ऑक्टोबर: स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगडाला प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प रायगड जिल्हा प्रशासनाने केलाय. तसे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रोपवे व्यवस्थापनाने यासाठी कंबर कसली आहे. प्लास्टिक बॉटल किंवा कचरा गडावरती जाऊ नये याकरीता खास व्यवस्था करणेत आली आहे. गडावरील रोपवे स्टेशननंतर बॅरीकेड्स बसवून प्रत्येक शिवप्रेमी पर्यटकांना प्लास्टिक न घेऊन जाण्याची विनंती करत तपासणी केली जाते. पर्यटकांजवळील प्लास्टिक पिशवी जमा करून त्याऐवजी त्यांना कागदी पिशवी देण्यात येते. शिवाय पिण्याच्या पाण्याची प्लास्टिक बॉटल जमा करण्यात येते. याकरता स्वतंत्र स्टँड तयार करण्यात आला आहे. विक्रीसाठी असलेल्या पाणी बॉटलची किंमत ४५ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. त्यापैकी २५ रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवली जाते रिकामी बॉटल जमा केल्या नंतर २५ रुपये रक्कम पर्यटकांना परत केली जाते. या अभिनव उपक्रमांचा सर्वच स्तरांतून जोरदार स्वागत होत असून शिवभक्त देखील सहकार्य करत असल्याने सध्या किल्ले रायगड प्लास्टिकमुक्त होण्याच्या मार्गावर  आहे.
First published:

Tags: Plastic, महाराष्ट्र, रायगड

पुढील बातम्या