गणेश नाईकांबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य, भाजप मंत्र्यांचं मोठं विधान

गणेश नाईकांबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य, भाजप मंत्र्यांचं मोठं विधान

जपने विधानसभेसाठी पहिल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

अजित मांढरे, प्रतिनिधी

ठाणे, 02 ऑक्टोबर : 'गणेश नाईक यांच्या बाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो विचार केला. योग्य वेळेत मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करणार आहेत' असं सांगत रात्री उशीरा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोकण पट्ट्यातील भाजपा उमेदवारांना एबी फार्मचं वाटप केलं. खरंतर मंगळवारी भाजपने विधानसभेसाठी पहिल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. सगळ्यात जास्त कार्यकर्ते आणि कुटुंबासह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांना तिकीट मिळण्याची शक्यता असताना दिल्लीतून जाहीर केलेल्या यादीत त्यांच्या जागी मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या सगळ्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला असल्याचं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. बेलापूर मतदार संघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. खरंतर तिकीट मिळण्याची शक्यता कमी वाटत असल्यामुळे मंदा म्हात्रे या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. पण अगदी शेवटच्या क्षणी गेम चेंज होत मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

इतर बातम्या - 'होय, आमच्या बाबत घेवाण कमी आणि देवाणच जास्त झाली'

युतीच्या फॉर्मुल्यानुसार, नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यात आले आहेत. यानुसार ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बेलापूर मतदार संघातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यास मातोश्री सकारात्मक होती. गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांसह राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं होतं.

ठाण्यातील खोपट परिसरात भाजपा पक्ष कार्यालयात रायगड जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी एबी फॉर्मचं वाटप केलं असून ठाण्याचे आमदार संजय केळकर, नवी मुंबईचे प्रशांत ठाकूर, भिवंडीचे महेश चौगुले, ऐरोलीचे संदीप नाईक, कल्याण पुर्वेचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड आणि बेलापूरच्या मंदा म्हात्रे यांना या एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं.

उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 3 दिवस उरले असताना या अर्जात काही चूका होऊ नये याचं दडपण उमेदवारांवर असतं. या चुका टाळण्यासाठी भाजपाने एबी फॉर्म वाटपास वेळ न लावता रात्री उशीराच फॉर्मचं वाटप केलं. शिवाय निवडणूकीत पोलिंग एजंट ने काय करावं? कशा प्रकारे निवडणुकिचा अर्ज भरावा? अशा विविध तांत्रिक बाबींवर रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं.

इतर बातम्या - काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

भाजपच्या उमेदवार यादीत मुलं, मुली, भाचे, सुना आणि जावई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस, कोथरूड- चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे या नेत्यांची नावं नाहीत. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर गणेश नाईक यांचंही नाव नाही. या यादीवर नजर टाकली तर घराणेशाहीची अनेक उदाहरणं दिसतात. भाजप नेत्यांचा मुलगा, जावई, मुली, सुना या सगळ्यांची नावं यादीत आहेत.

 

 

First published: October 2, 2019, 7:39 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading