मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: गर्दी पाहून पालकमंत्री संतापल्या; गर्दी आवरा अन्यथा कडक लॉकडाऊनचा दिला इशारा

VIDEO: गर्दी पाहून पालकमंत्री संतापल्या; गर्दी आवरा अन्यथा कडक लॉकडाऊनचा दिला इशारा

Aditi Tatkare on lockdown: रायगड जिल्ह्यातील म्हसळा बाजारपेठेतील गर्दी पाहून पालकमंत्री अदिती तटकरे चांगल्याच संतापल्याचं पहायला मिळालं.

रायगड, 29 मे: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होत असला तरी दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हा अद्यापही पूर्णपणे गेलेला नाहीये. तसेच राज्यात लॉकडाऊनही (Lockdown) उठवण्यात आलेला नाहीये. अशा परिस्थिती काही ठिकाणी नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचं पहायला मिळत आहे. अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातील (Raigad) बाजारपेठेत पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी गर्दी पाहिली आणि त्या चांगल्याच संतापल्या. त्यानंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं.

तौत्के चक्रीवादळानंतर रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊन काही प्रमाणत शिथिल करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊन शिथिलता करण्याचा अर्थ नागरिकांनी लॉकडाऊन संपला असा घेतला आहे. म्हसळा शहरात देखील अशी स्थिती निर्माण झाली असून, म्हसळा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री यांनी बाजारपेठेतील गर्दी पाहून थेट कडक लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे.

VIDEO: रायगड, रत्नागिरी, पुण्याला मुसळधार पावसाने झोडपलं; पुणे-नगर महामार्गावर साचले पाणी, पुढील 4 दिवस पावसाचे

शनिवारी पालकमंत्री अदिती तटकरे या म्हसळा दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांची गाडी म्हसळा बाजारपेठेतून जात असताना त्यांना बाजारपेठेत मोठ्याप्रमाणात गर्दी असल्याचे निदर्शनास आले. बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला असून, नागरिकांच्या तोंडावर मास्क देखील निदर्शनास येत नव्हता. बाजारपेठेतील हे दृश्य पाहून संतापलेल्या पालकमंत्री यांनी गर्दी कमी करण्याबाबत नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना गर्दी थांबवण्यासाठी नियोजन करा.

कोरोना अजून गेलेला नसून आपण काळजी घेतली पाहिजे. सोमवारी मी पुन्हा म्हसळा शहरात येणार आहे. यावेळी जर मला बाजारात गर्दी दिसली तर मी कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश देईन असा थेट इशारा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी म्हसळा नगरपंचायतीला दिला आहे.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Raigad