हे वाचा-महाडमध्ये इमारत दुर्घटनेबद्दल नवी माहिती, काही तासांआधीचा PHOTO आला समोर मोहम्मद बागी असं या चिमुकल्याचं नाव आहे. हा मुलगा त्याची आई आणि भावंडांसह खोलीत बसला होता आणि अचानक काही कळायच्या आत इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली हा चिमुकला दबला गेला होता. NDRF आणि पोलिसांनी या 6 वर्षांच्या मुलाला सुखरुपपणे बाहेर काढलं आहे. या इमारतीमध्ये 43 कुटुंब राहात होती त्यापैकी 18 कुटुंबातील लोक कोरोनामुळे गावी गेले होते. घटनास्थळी 19 तासांपासून पोलीस, एनडीआरएफच्या मदतीनं मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. सोमवारी जेसीबीच्या मदतीनं 8 जणांना ढिगाऱ्याखालून काढलं असून सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या ढिगाऱ्याखाली 15 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून सध्या NDRF कडून त्यांचा शोध सुरू आहे.#Mahad @News18lokmat pic.twitter.com/5THaMY6tJS
— Manoj Khandekar (@manojkhandekar) August 25, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raigad