अलिबाग-पेण रस्त्यावर 2 महिलांना पिकअपने चिरडलं, एक जागीच ठार

अलिबाग-पेण रस्त्यावर 2 महिलांना पिकअपने चिरडलं, एक जागीच ठार

या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे.

  • Share this:

रायगड, 17 नोव्हेंबर : अलिबाग पेण रस्त्यावर वाडगाव गावाजवळ पिकअप व्हॅनने दोन महिलांना धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. सुशीला वसंत आग्रे, प्रेरणा प्रदीप पवार असं या अपघातग्रस्त महिलांची नावे आहेत. प्रेरणा पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी सुशीला यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.

अलिबाग येथे सुशीला वसंत आग्रे, प्रेरणा प्रदीप पवार या घरकाम करण्यासाठी नेहमी जात असत. नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून या दोघी चालत वाडगाव येथे आपल्या घरी येत होत्या. वाडगाव नजीक दोघी आल्या असता पेणकडून पिकअप व्हॅन (एमएच 06/ बीडब्लू 1653) हा चुकीच्या रस्त्याने आला आणि दोघींना उडविले. यात प्रेरणा पवार ही जागीच ठार झाली आहे. तर सुशीला हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी त्वरित रुग्णवाहिका बोलवून जखमी सुशीला हिला रुग्णालयात पाठवले. तर मयत प्रेरणा हीचा मृतदेह देखील रुग्णालयात पाठविला. चालक प्रजापती याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पिकअप व्हॅन ही भरधाव असल्याने चुकीच्या दिशेने येऊन एका घराच्या आणि झाडाच्यामध्ये अडकला आहे.

अपघातात ठार झालेल्या प्रेरणा पवार यांना दोन जुळी मुले आणि एक मुलगा असे तीन मुले आहेत. तर पती, सासू सासरे असा परिवार आहे. या अपघातामुळे प्रेरणाची तिन्ही मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरवलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 17, 2020, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading