आंबेनळी घाटात 30 फूट दरीत कोसळली एसटी, 27 प्रवासी जखमी

पोलादपूरजवळ पायटे इथे अक्कलकोट-महाड एसटी बस दरीत कोसळून दुर्घटना.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 07:14 AM IST

आंबेनळी घाटात 30 फूट दरीत कोसळली एसटी, 27 प्रवासी जखमी

शैलेश पालकर (प्रतिनिधी)रायगड, 31 ऑक्टोबर:

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात गेल्या वर्षी दापोली कृषी विद्यापिठाची बस कोसळून झालेल्या भीषण अपघाताची पुनरावृत्ती बुधवारी रात्री अक्कलकोट-महाड एसटी बस दरीत कोसळून घडली. मात्र, यावेळी सुदैवाने एका आंब्याच्या झाडाला ही बस अडकल्याने मोठया प्रमाणावरील मनुष्यहानी टळली. या अपघातामध्ये बसचालकासह 21 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर महाडमधील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

वरंध घाट पावसाळयात रस्ता खचल्याने बंद झाला त्यामुळे आंबेनळी घाट हा एकमेव पर्याय असल्यानं त्या सत्यानं बसची वाहतूक होते. बुधवारी रात्री अक्कलकोट-महाड एसटी 30 फूट खोल दरीत कोसळली. ही बस आंब्याच्या झाडाला अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दुर्घटनेची माहिती पोलादपूर शहरामध्ये पोहोचताच अनेक तरुणांनी तातडीने घटनास्थळी मदत कार्यासाठी धाव घेतली. यावेळी भोर येथून शाळेतील मुलांना सोडून परत येणारा पोलादपूर येथील वैभव शंकर मपारा या जीपचालकाने त्याच्यासोबतच्या प्रवाशाच्या मदतीने एस.टी.बसमधील प्रवाशांना कमरेच्या बेल्टच्या साह्याने बाहेर काढण्यात यश मिळविले.

अक्कलकोट-महाड बस दुर्घटनेत 27 प्रवाशांसह बस चालक जखमी झाले आहेत. एसटी चालक एन.पी. खरात यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. वृध्द महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला त्वरित महाड येथे हलविण्यात आले.

ही 'भाऊबीज' ठरली शेवटची.. तीन बहिणींच्या एकुलत्या एक भावाची आत्महत्या

Loading...

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

CCTV VIDEO: जेवण चांगल न दिल्याच्या रागातून वेटरला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 07:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...