नाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका

नाईट लव्हर बारवर नार्कोटिक्स विभागाची छापा, 14 मुलींची सुटका

मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नाईट लव्हर बारमध्ये नार्कोटिक्सचे डीसीपी शिवदीप लांडे यांनी छापा टाकला.

  • Share this:

मुंबई, 12 जु्लै- मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नाईट लव्हर बारमध्ये नार्कोटिक्सचे डीसीपी शिवदीप लांडे यांनी छापा टाकला. मिळालेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री नार्कोटिक्स विभागाने ही कारवाई केली. बारमधील 14 तरुणींची सुटका करण्यात आली. 15 ग्राहकांसह बार मॅनेजर, सुपरवायझर आणि कॅशियरला अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.

वसंत नगरीत मृतदेह सापडला...

नालासोपारा पूर्वेकडील वसंत नगरी येथील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. अण्णा या नावाने तो परिसरात प्रचलित होता. मिळेल ते काम करून तो आपली उपजीविका करीत होता. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी नालासोपारा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे. अण्णाची हत्या झाली की, आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिवसेना नगरसेविकेच्या कन्येची घरगुती वादातून पतीनेच केली हत्या

घरगुती वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना कल्याणच्या मलंगगड परिसरातील वाडी गावात घडली आहे. मृत महिला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) शिवसेना नगरसेविकेची कन्या होती. राज पाटील असे आरोपी पतीचे तर वैशाली पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. वैशाली ही केडीएमसीच्या शिवसेना नगरसेविका विमल भोईर यांची कन्या होती.

वाडी गावात राहणाऱ्या राज पाटील याचे दहा वर्षांपूर्वी उल्हासनगरच्या माणेरे गावात राहणाऱ्या वैशाली भोईरसोबत लग्न झाले होते. मात्र, पत्नी आवडत नसल्याने राज याचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यातूनच शु्क्रवारी संध्याकाळी राज याने धारदार शस्त्राने वैशालीची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना याबाबत माहिती दिली. हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे मलंगगड परिसरात तणाव काळी काळ तणाव पसरला होता.

नाट्यगृहाची दुरावस्था, भरत जाधवच्या संतापाचा स्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2019 07:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading