पुण्याच्या कार्यक्रमात 'मोदी मोदी' घोषणांवर काय म्हणाले राहुल गांधी?

पुण्याच्या कार्यक्रमात 'मोदी मोदी' घोषणांवर काय म्हणाले राहुल गांधी?

पुण्यामध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमात मोदींच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. यावर राहुल गांधींनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

  • Share this:

पुणे, 5 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेकांबद्दल बोलतात तेव्हा त्याची लगेचच मोठी बातमी होते. संसदेच्या अधिवेशनात लोकसभेमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अचानक जाऊन मिठी मारली तेव्हा तर त्याबद्दल मोठी चर्चा झाली.

नरेंद्र मोदी माझे विरोधक असले तरी मला त्यांच्याबद्दल काहीच आक्षेप नाही हे राहुल गांधी वेळोवेळी बोलून दाखवत असतात. असाच एक प्रसंग राहुल गांधींच्या पुण्याच्या कार्यक्रमात घडला. राहुल गांधींनी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात काही जणांनी मोदींच्या नावाने घोषणा दिल्या तेव्हाही राहुल गांधींनी त्यांना विरोध केला नाही. 'मी मोदींचा द्वेष करत नाही, माझं त्यांच्यावर प्रेम आहे', असं राहुल गांधी म्हणाले.

याआधी मात्र त्यांनी मोदींवर टीका केली. पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने जगाला चांगला संदेश गेला आहे. पण या हल्ल्याचा राजकीय वापर करू नये, आम्ही या हल्ल्याचं राजकारण करत नाही पण पंतप्रधान मात्र करतात, असा आरोप त्यांनी केला. आपल्यालाच सगळं समजतं, बाकी कुणाला काहीच कळत नाही, असं पंतप्रधानांना वाटतं, असंही राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधानांवर एवढी कडवी टीका केल्यानंतरही, सभेमधल्या काही जणांनी मोदींच्या घोषणा द्यायला सुरुवात केली तेव्हा मोदींच्या घोषणांची मला काहीच अडचण नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

या सभेच्या आधी, राहुल गांधींनी सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार, राजू शेट्टी, अमोल कोल्हे यांची भेट घेतली. काँग्रेसचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षातल्या तरुणांच्या त्यांनी भेटी घेतल्या. तरुणांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमामध्ये अभिनेते सुबोध भावे यांनी राहुल गांंधींवर बायोपिक बनवण्याची इच्छा बोलून दाखवली. मला तुम्हाला समजून घ्यायचं आहे, असं सुबोध भावे म्हणाले.

यावर, कुटुंबात झालेल्या दोन हत्यांचे माझ्यावर मानसिक आघात झालेत.शाळा बंद होती त्यामुळे घरीच शिकावं लागलं. नंतर मी राजकारणात यायचा निर्णय घेतला. सत्य परिस्थिती स्वीकारली म्हणून धाडस करू शकलो. मला अपमानातूनच लढण्याची ताकद मिळाली, असंही राहुल गांधींनी सांगितलं.

================================================================================================================================================================

VIDEO: राहुल गांधींनी पुण्याच्या ईशाला दिली लोकसभेची ऑफर

First published: April 5, 2019, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading