अमरावती, 12 जून : 'काँग्रेस (Congress) हा यूपीएचा (UPA) आत्मा आहे त्यामुळे देशात पंतप्रधान सुद्धा काँग्रेसचाच होईल. प्रशांत किशोर (Prashant Kishor)यांनी सुद्धा दोनदा सांगितला आहे की राहुल गांधीच पंतप्रधान बनणार, त्यामुळे आमचा विश्वास लोकशाहीवर आहे' असं वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं.
प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसच्या गोटातही या भेटीमुळे चिंतातूर वातावरण पाहण्यास मिळत आहे.
नागपूरात बोगस डॉक्टरच्या आवळल्या मुसक्या; असंख्य गरीब रुग्णांना घातला गंडा
'देशात नवीन यूपीए स्थापन होईल व त्याचे नेते शरद पवार असेल अशी चर्चा असताना त्यांना जे लोकं प्रमोशन करत आहे, त्याच लोकांनीच सांगितलं की काँग्रेस हा युपीएचा आत्मा आहे. त्यामुळे पंतप्रधान सुद्धा काँग्रेसचाच होईल', असं वक्तव्य नाना पटोले यांनी करत राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.
पुण्याहून घरी परतणाऱ्या कामगारावर काळाचा घाला!
तसंच, 'सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात दोन वेळा देशात यशस्वीरित्या सरकार चाललं हे सर्व जनतेला माहित आहे त्यामुळे कोणाच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही', असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
'प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास..'
'मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज आंदोलन करत आहे. संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. संभाजीराजे यांनी वेगळा पक्ष काढणार असल्याची चर्चा आहे. पण येत्या निवडणुकीत वंचित आघाडी व संभाजीराजे एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल. शिवशाहीला बसणार नाही', अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.