Home /News /maharashtra /

राहुल गांधींच्या हट्टामुळे महाराष्ट्रात बिघडला असता खेळ - तीन दिवसांच्या सरकारमागची Inside Story

राहुल गांधींच्या हट्टामुळे महाराष्ट्रात बिघडला असता खेळ - तीन दिवसांच्या सरकारमागची Inside Story

हळूहळू उलगणाऱ्या पडद्यामागच्या घडामोडी सांगतात की महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार स्थापण्याच्या घडामोडी सुरू असताना राहुल गांधी यांच्या कँपमुळेच अडथळे येत होते.

    अनिल राय नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात एवढ्या राजकीय घडामोडी झाल्या, त्यावर काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी कुठलीही मोठी प्रतिक्रिया दिली नाही. ते कुठल्याही चर्चेत असल्याच्या बातम्या आल्या नाहीत. पण हळूहळू उलगणाऱ्या पडद्यामागच्या घडामोडी सांगतात की महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार स्थापण्याच्या घडामोडी सुरू असताना राहुल यांच्यामुळेच अडथळे येत होते. राहुल गांधी यांच्या हट्टामुळेच काँग्रेसकडून निर्णय घ्यायला विलंब झाला आणि ती संधी साधून भाजपने अजित पवारांना हाताशी घेऊन सरकार स्थापन केलं. तीन दिवसांचं सरकार स्थापन झालं त्यामागे राहुल यांचा हट्ट होता, असं आता स्पष्ट होत आहे. 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर लगेचच शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क साधला होता. 12 नोव्हेंबरपर्यंत तीन पक्षांचं सरकार स्थापायचं याविषयी सेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सहमतीसुद्धा झाली होती. काँग्रेसकडून विलंब होत होता. महाराष्ट्रात शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार हे निश्चित होऊनसुद्धा त्याविषयी औपचारिक घोषणा होत नव्हती. शुक्रवारी पहिल्यांदाच तीन पक्षांचे नेते एकत्र आले होते. पण त्याही दिवशी औपचारिक घोषणा होऊ शकली नाही आणि शनिवारी सकाळी भाजपने बाँब टाकला. सकाळी लवकरच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याची बातमी आली आणि राजकीय भूकंप झाल्याची बातमी काँग्रेस आणि शिवसेनेला झाली. टीम राहुलला होती शंका राहुल गांधी आणि त्यांच्या जवळचे काँग्रेस नेते शिवसेनेबरोबर जाण्यास फारसे उत्सुक नव्हते. वाचा - उद्धवांनी वडिलांचा 'हिंदुत्त्ववाद' बाजूला ठेऊन आजोबांचा 'निर्धमीवाद' अंगिकारावा शिवसेनेसमोर या गटाने काही कडक अटी घालण्याची योजना आखली होती. त्यामध्ये वीर सावरकरांशी शिवसेनेनं जवळीक साधू नये, हिंदू राष्ट्रवाद सोडून द्यावा, मराठीच्या मुद्द्यावरचं राजकारण करू नये अशा अटी राहुल गांधी कँपने शिवसेनेसाठी तयार केल्या होत्या. हे मुद्दे शिवसेनेनं मान्य केले की मगच या महाविकासआघाडीची औपचारिक घोषणा करावी, असं या गटाला वाटत होतं. राहुल गांधी यांच्या या गटामध्ये के. सी. वेणुगोपाल सामील होते, असं कळतं. वाचा - अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरलाय का? अजित पवारांनी केला खुलासा काश्मीरप्रश्नी शिवसेनेची भूमिका जगजाहीर असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादसुद्धा सेनेशी युती करण्याच्या विरोधात होते. सोनिया गांधींना शिवसेनेला समर्थक देताना या नेत्यांमुळे विलंब होत होता. त्याच वेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी किल्ला लढवला. सोनिया गांधी यांच्याशी थेट चर्चा करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली दौऱ्यापूर्वीच पवारांनी केली सेटिंग प्रत्यक्ष सोनिया गांधी यांना भेटण्याआधीच शरद पवारांनी व्यवस्था लावून ठेवली होती. वाचा - भुजबळांच्या विधानानं उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स वाढला; कुणाचा पत्ता होणार कट? काँग्रेसच्या अंतर्गत गोटातली प्रत्येक हलचाल त्यांना कळत होती. 18 नोव्हेंबरला काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सरकार बनवण्यात सकारात्मक होईल असं दिसताच सोनिया गांधींबरोबर शरद पवार यांनी चर्चा करण्याचं ठरवलं. पवारांचा प्लॅन बी होता तयार एवढी तयारी करूनही काँग्रेसकडून शिवसेनेसाठी सहमती न झाल्यास काय करायचं हा प्लॅन बी शरद पवारांकडे रेडी होता. शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले त्याच वेळी त्यांनी मोदींनाही याची कल्पना दिली असावी, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांची आघाडी झाली नाही, तर भाजपला साथ द्यायचा विचार शरद पवार करत होते. पण अजित पवार आणि भाजपच्या घाईमुळे सगळा खेळ बिघडला.
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    Tags: Maharashtra government, Rahul Gandhi (Politician), Sharad Pawar (Politician), Sonia gandhi

    पुढील बातम्या