मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भंडाऱ्यात 10 बाळांच्या मृत्यूमुळे राहुल गांधी हळहळले, उद्धव ठाकरेंकडे केली मागणी

भंडाऱ्यात 10 बाळांच्या मृत्यूमुळे राहुल गांधी हळहळले, उद्धव ठाकरेंकडे केली मागणी

भंडारा सामान्य रुग्णालयात (Bhandara District General Hospital) मध्यरात्री आग लागली होती. आगीमुळे नवजात शिशु केअर यूनिट SNIC मधील 17 नवजात बाळांपैकी 10 जणांचा मृत्यू झाला.

भंडारा सामान्य रुग्णालयात (Bhandara District General Hospital) मध्यरात्री आग लागली होती. आगीमुळे नवजात शिशु केअर यूनिट SNIC मधील 17 नवजात बाळांपैकी 10 जणांचा मृत्यू झाला.

भंडारा सामान्य रुग्णालयात (Bhandara District General Hospital) मध्यरात्री आग लागली होती. आगीमुळे नवजात शिशु केअर यूनिट SNIC मधील 17 नवजात बाळांपैकी 10 जणांचा मृत्यू झाला.

मुंबई, 09 जानेवारी : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात ( Bhandara District General Hospital) आग लागल्यामुळे गुदमरुन 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसंच मृत बाळांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करावी, अशी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

भंडारा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री आग लागली होती.  आगीमुळे नवजात शिशु केअर यूनिट SNIC मधील 17 नवजात बाळांपैकी 10 जणांचा गुदमरून करुण अंत झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भंडारा रुग्णालयातील दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.  'महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना अत्यंत वेदनादायी आहे.  जीव गमावलेल्या बाळांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो' अशी भावना राहुल गांधी यांनी ट्वीट करून व्यक्त केली.

तसंच, या दुर्घटनेमध्ये जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

तर भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित देशमुख यांनी सुद्धा या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेबद्दल शब्दांत दु:ख व्यक्त करणे अशक्य आहे. बाळांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. या दुखद संकटाच्या प्रसंगात देव त्यांना शक्ती देवो, अशी भावना अमित शहांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान,  भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

गुदमरून 10 बाळांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णालयाच्या SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालक दाखल होती.  शनिवारच्या मध्यरात्री जवळपास 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता.

त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला आहे.

First published: