राहुल गांधी आजपासून मराठवाडा दौऱ्यावर

राहुल गांधी आजपासून मराठवाडा दौऱ्यावर

आज मराठवाड्यात नांदेड आणि परभणी जिल्ह्यात जाऊन ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहे.

  • Share this:

08 सप्टेंबर: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज मराठवाड्यात नांदेड आणि परभणी जिल्ह्यात  जाऊन  ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहे.

आज नऊच्या सुमारास राहुल गांधी नांदेड एअरपोर्टवर पोचतील. नांदेडमध्ये त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा विभागीय मेळावा होणार आहे. तिथून परभणीत पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर इथं दुपारी बाराच्या सुमारास शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहे. त्यानंतर परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी दीड वाजता आयोजित जाहीर संघर्ष सभेला ते संबोधित करणार आहेत.

याशिवाय जिल्ह्यातील २०० व्यापारी, वकील आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींची ते बैठकही घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त काँगेसकडून शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे बॅनर, होर्डिंग लावण्यात आले आहेत. तर भव्य असा सभा मंडपही उभारण्यात आलाय. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय.

First published: September 8, 2017, 8:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading