मुंबई, सागर कुलकर्णी, 30 जून : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. राज्यात देखील काँग्रेसची धुळधाण उडाली. मतांची आकडेवारी पाहता वंचित बहुजन घाडीमुळे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला असं म्हटलं जातं. दरम्यान, राज्यातील पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न सध्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी करत आहे. त्यावर दिल्लीत राज्यातील नेत्यांची शनिवारी ( काल ) बैठक झाली. त्यावेळी राहुल गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात आघाडीला फटका बसला असं गाऱ्हाण काँग्रेसचे नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडलं. त्यानंतर मात्र राहुल गांधी यांनी आक्रमक होत दलित मतदार वंचितकडे गेले तेव्हा तुम्ही काय करत होता? तुम्हाला मतदार टिकवून ठेवता आला नाही का? असा सवाल केला. राहुल गांधी यांचं आक्रमक रूप पाहून काँग्रेसच्या नेत्यांना मात्र कोणतंही उत्तर देता आलं नाही. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब : सूत्र
काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण?
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सुरू झालेली चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. कारण, गांधी घराण्याकडून अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, अशी माहिती आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. सुशीलकुमार शिंदे हेच जर काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणीतरी मराठी व्यक्ती या पदावर बसणार आहे. दरम्यान, राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून सुशिलकुमर शिंदे अध्यक्ष झाल्यास त्याचा फायदा देखील काँग्रेसला होऊ शकतो.
ताडोबात मधू वाघिणीसह 3 बछड्यांचं दर्शन, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या