भाजपमधील OBC वादावर पहिल्यांदाच बोलले राजू शेट्टी, म्हणाले...

भाजपमधील OBC वादावर पहिल्यांदाच बोलले राजू शेट्टी, म्हणाले...

भाजपमधील या वादंगावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाष्य केलं आहे.

  • Share this:

बालाजी निरफळ, 16 डिसेंबर : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे तसंच एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर व्यासपीठावरून आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपमधील या वादंगावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाष्य केलं आहे.

'नरेंद्र मोदी आणि अमित शहा सोडले तर भाजपमध्ये केवळ ओबीसीच नाही तर सगळ्याच समाज घटकांवर अन्याय केला जात आहे,' असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे. तसंच यावेळी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्याबाबतही भाष्य केलं आहे. 'सावरकर यांच्या वादा पेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. अवकाळीमुळे झालेलं नुकसान, दुष्काळ, सिंचन यासारखे अनेक प्रश्न आहेत,' असं म्हणत राजू शेट्टी यांनी शेतकरी प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधलं आहे.

भाजपचं धक्कातंत्र, विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकरांची निवड

'शेतकरी किड्या-मुंग्यासारखा मरत आहे. ते आधी थांबवा. शेतकरी प्रश्नापुढे सावरकर यांच्यावरील वाद निरर्थक आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. 1 रुपये 16 पैसे दराने शेतीसाठी वीज द्या,' अशी मागणी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजू शेट्टी हे नव्या सरकारलाही कोंडीत पकडू शकतात.

भाजपमधील ओबीसी नेत्यांच्या नाराजीची चर्चा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला दुहेरी धक्का बसला आहे. कारण निवडणुकीनंतरच्या वाटाघाटीत शिवसेनेसोबत बिनसल्याने भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. त्यानंतर भाजपला बंडखोरीचं मोठं ग्रहण लागलं. 'मास बेस लीडर' अशी ओळख असलेले पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे बंड करणार असल्याची शक्यता दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे.

काँग्रेसच्या 2 माजी मुख्यमंत्र्यांवर शिवसेनेची खोचक टीका, महाविकास आघाडीत जुंपणार?

2014 मध्ये राज्यात सत्तांतर घडल्यानंतर भाजपमध्ये नेतृत्वावरून कुरघोडी सुरू झाली. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना मागे टाकत देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली. त्यानंतर काही महिन्यांनी एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातूनही बाहेर पडावं लागलं. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा सर्व प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत होता. त्यामुळे निवडणूक निकालानंतर भाजपला सत्तास्थापनेस अपयश आल्यानंतर नाराज नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 01:58 PM IST

ताज्या बातम्या