मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पद्म पुरस्कारांची घोषणा, राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार 'पद्मश्री'चे मानकरी

पद्म पुरस्कारांची घोषणा, राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार 'पद्मश्री'चे मानकरी

71 व्या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

71 व्या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

71 व्या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

नवी दिल्ली,25 जानेवारी: 71 व्या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जुन्या वाणांची जपणूक करणारी बीजमाता राहीबाई पोपेरे आणि हिवरे बाजार गावाला आदर्श गाव करणाऱ्या पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत मान्यवरांना पद्मश्री सन्मान करण्यात येणार आहे. एकूण 22 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या एका आदिवासी महिलेला पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. राहीबाईंनी 53 विविध जातीच्या देशी वाणांच्या 113 जातीचं संवर्धन केलं. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरन्वित केले आहे. तसेच आदर्श गाव योजनेचे पुरस्कर्ते पोपटराव पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याच बरोबर जगदीप लाला आहुजा (सामाजिक कार्य), मोहम्मह शरीफ (सामाजिक कार्य), जावेद अहमद टाक (दिव्यांगासाठी कार्य), तुलसी गौडा (पर्यावरण), सत्यनारायण मुंदायूर (शिक्षण क्षेत्रातील कार्य), अब्दुल जब्बार (सामाजिक कार्य), उषा चौमूर (सामाजिक कार्य), हरेकला हजब्बा (शिक्षण क्षेत्रातील कार्य), अरुणोदय मंडल (आरोग्य क्षेत्र), राधामोहन आणि साबरमती (कृषी क्षेत्रातील कार्य), कुशल कोनवार सरमा (प्राण्यांसाठी कार्य), त्रिनीटी साईओ (कृषी क्षेत्रातील कार्य), रवी कन्नन (आरोग्य), एस रामकृष्णन (दिव्यांगांसाठी कार्य), सुंदरम वर्मा (पर्यावरण), मुन्ना मास्टर (कला), योगी अॅरोन (आरोग्य क्षेत्रातील कार्य), हिंमत राम भांभू (पर्यावरण कार्य), मुजीक्कल पंकजाक्षी (कला क्षेत्र)

सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार

देशाचं संरक्षण करताना दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या लष्कारातील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ऑरिअन यांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे.

First published:

Tags: Padmashri award, Popatrao pawar, Rahibai popere, Suresh wadkar