रायगडमध्ये सुनील तटकरेंना हादरा, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश

कट्टर समर्थकाने शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात सुनील तटकरे यांना धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 10:47 AM IST

रायगडमध्ये सुनील तटकरेंना हादरा, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश

रायगड, 17 ऑगस्ट : रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक रघुवीर देशमुख यांनी आपल्या परिवारासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. कट्टर समर्थकाने शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात सुनील तटकरे यांना धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्या खास निकटवर्तीयांपैकी असलेल्या रघुवीर देशमुख यांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भरतशेठ गोगावले यांचे पारडे जड होणार असं जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचं मत आहे. रघुवीर देशमुख यांचेसोबत त्यांच्या पत्नी सौ. माधवी देशमुख, राज देशमुख, रोहन देशमुख यांनीही शिवबंधन हाती बांधलं आहे.

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या महाड तालुक्यातील ढालकाठी येथील शिवनेरी या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. रघुवीर देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने रायगड विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण तालुक्यात शिवसेनेला त्यांचा अनुभव आणि अभ्यासाचा फायदा होईल, अशी अपेक्षा भरत गोगावले यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना संघटनेत रघुवीर देशमुखांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, असं आमदार गोगावले यांनी सांगितलं. तर रघुवीर देशमुख यांनी आपल्या प्रवेशाप्रसंगी विकासकामांना चालना देण्याकरिता आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे  स्पष्ट केलं. पण त्याचवेळी खासदार सुनील तटकरे यांच्या परिवाराविषयी आपल्याला आदर असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनिल तटकरे यांच्या विजयात रघुवीर देशमुख यांचा मोलाचा वाटा होता. देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने रायगड शिवसेनेला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि पर्यायाने सुनील तटकरेंसमोर चांगलंच आव्हान निर्माण होणार आहे.

Loading...

SPECIAL REPORT: पुण्याकडे जाणारा सगळ्यात जवळचा रस्ता वाहतुकीसाठी बंद, व्यवसायासह पर्यटनाला फटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2019 10:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...