कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसाचा जोर वाढल्यामुळे राधानगरी धरणातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. राधानगरी धरण दुसऱ्यांदा 100 टक्के भरले असून, सोमवारी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गगनबावडा आणि चंदगडमध्येसुद्धा पावसाचा जोर वाढल्यानं जिल्ह्यातील 18 बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत.