पराभवाने काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्ते खचले: विखे-पाटील

पराभवाने काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्ते खचले: विखे-पाटील

विरोधी पक्षनेतेपदाचे काय करायचे हा विरोधी पक्षाचा प्रश्न आहे, असे सांगत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसचा आणि त्यांचा संबंध संपल्याचे स्पष्ट केले आहे.

  • Share this:

शिर्डी, 03 जून: विरोधी पक्षनेतेपदाचे काय करायचे हा विरोधी पक्षाचा प्रश्न आहे, असे सांगत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसचा आणि त्यांचा संबंध संपल्याचे स्पष्ट केले आहे. मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. माझा राजीनामा अद्याप विधानसभा अध्यक्षांनी स्विकारलेला नाही. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. पण मीच या पदावर न राहण्याचा निर्णय घेतल्याचे विखे-पाटलांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काय करायचे हा काँग्रेसचा प्रश्न आहे. भविष्यातील रणनीती कशी असावी हा प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या या झालेल्या दारुण पराभवाने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले आहे. इतकच नव्हे तर पक्षाचे आमदार देखील खचले आहेत. शिर्डीत विखे यांनी अब्दुल सत्तार आणि जयकुमार गोरे यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.

राधाकृष्ण विखेंनी सुरू केली आवराआवर, राज्यातही आता विरोधी पक्षनेता नाही?

महाराष्ट्र विधानसभेचं यंदाचं पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानभवनातील विरोधी पक्षनेते कार्यालयातील सामानाची आवराआवर सुरू झाली आहे.

काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता विखे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते कार्यालयाच्या कामाच्या जबाबदारीतून रिक्त होण्याच्या दिल्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक कधी करायची याचा निर्णय आता सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे राज्याला विधानसभेत विरोधी पक्षनेता कधी मिळणार, हे आता पाहावं लागेल.

अधिवेशनापूर्वी विखेंचा भाजप प्रवेश

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी शक्यता आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मंत्री होण्याआधी विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनीही सांगितलं.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते नगरमधून खासदार म्हणून निवडूनही आले. सुजय विखे यांच्यापाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा होती पण त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता.राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, असाही दबाव त्यांच्यावर होता. अखेर बऱ्याच दिवसांच्या चर्चेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.

SPECIAL REPORT : नागाला वाचवण्यासाठी प्राणाची बाजी, विहिरीतील थरार कॅमेरात कैद

First published: June 3, 2019, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading