मुंबई, 09 ऑगस्ट : मागच्या दिड महिन्यापासून रखडेला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज झाला. तब्बल 39 दिवसानंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला. एकूण 18 जण मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये पहिल्या नंबरला घेतलेल्या राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe- Patil) यांनी काँग्रेसमधून सुरूवात करत भाजपमध्ये प्रवेश करत आज कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचा जन्म 15 जून 1959 साली झाला.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी बीएस्सी अॅग्री हे शिक्षण पूर्ण केले. ते मार्च 1995 पासून विधानसभेत आहेत. त्यांनी आतापर्यंत शिर्डी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. यापूर्वी ते काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जायचे. त्यांनी भाजप शिवसेना सरकार काळात काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाचेही काम केले आहे. परंतु त्यांनी अचानक धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. विखे पाटील यांचा मुलगाही भाजपकडून खासदार आहे.
हे ही वाचा : शपथविधीला पहिला मान विखेंना, मुख्यमंत्र्यांच्या गटाला सहावा क्रमांक!
विखे पाटील हे 1997 ते 1999 या काळात पहिल्यांदा कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय,पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय म्हणून मंत्रीपद भुषविले होते. त्यानंतर युतीचे सरकार आल्याने त्यांनी आमदार म्हणून काम पाहिले. दरम्यान 2009 साली औरंगाबाद जिल्हयाच्या पालकमंत्री पदासह त्यांनी शालेय शिक्षण विधी व न्याय ही मंत्रीपदे भुषवली आहेत.
तसेच 7 नोव्हेंबर 2009 साली मंत्री परीवहन,बंदरे आणि विधी व न्याय 11 नोव्हेंबर 2010 ते 27 सप्टेंबर 2014 पर्यत मंत्री कृषी व पणन तथा पालकमंत्री अमरावती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांची 10 नोव्हेंबर 2014 साली विधीमंडळ गटनेते पदावर निवड करण्यात आली होती. 24 डिसेंबर 2014 ते 4 जून 2019 सालापर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेते पदावर होते.
हे ही वाचा : 'मी एकनाथ शिंदेंचा पुतण्या'; जुगार खेळताना अटक झालेल्या शिवसेना शाखाप्रमुखाचा दावा
दरम्यान त्यांनी अचानक काँग्रेसमधून उडी घेत भाजपसोबत जात पुन्हा मंत्रापदावर विराजमान झाले. 16 जून 2019 ते 24 आॅक्टोंबर 2019 साली गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला तसेच 24 आॅक्टोबर 2019 पासून विधानसभा सदस्य तसेच महाराष्ट्र लोकलेखा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. याचबरोबर ते पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन अहमदनगरचे चेअरमन आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Ahmednagar News, BJP, Eknath Shinde, Radha krishna vikhe patil