विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स, मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' सल्ला

विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स, मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' सल्ला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांत दिल्लीला जाणार आहेत. त्यानंतरच विखेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा करण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 6 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुढील काही दिवसांत दिल्लीत चर्चा करून पक्षप्रवेशाबाबत भूमिका घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून विखे पाटील यांना देण्यात आलं असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांत दिल्लीला जाणार आहेत. त्यानंतरच विखेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा करण्यात येणार आहे. तुर्तास विखे यांना भाजपकडून सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेले आणि सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्कात असणारे सहा ते सात आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. या आमदारांसोबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रवेशाबाबत चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आघाडीतील काही आमदार आमच्या पक्षात येतील, असा दावा भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखेंच्या संपर्कात असलेले आमदार हे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर हे आमदार भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

VIDEO: लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार, राऊत यांच्या दाव्यामुळे ठिणगी

First published: June 6, 2019, 12:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading