राधाकृष्ण विखेंच्या पत्नी काँग्रेसमध्ये नाराज, बोलून दाखवली खंत

राधाकृष्ण विखेंच्या पत्नी काँग्रेसमध्ये नाराज, बोलून दाखवली खंत

जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचे गटनेते निवडताना पक्षाने विश्वासात न घेतल्याची खंत मावळत्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी बोलून दाखवली

  • Share this:

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 31 डिसेंबर : भाजपमध्ये एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील नाराज असल्याचं उघड झालं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षात असलेल्या त्यांच्या पत्नी शालिनी विखे याही नाराज असल्याचं समोर आलं आहे. तशी खदखद त्यांनी बोलून दाखवली आहे.

जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचे गटनेते निवडताना पक्षाने विश्वासात न घेतल्याची खंत मावळत्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी बोलून दाखवली.  मुंबईत झालेल्या बैठकीला त्या आल्या नव्हत्या लोकसभेच्या निवडणुकांपासून त्या पक्षाच्या एक्टिविटीपासून दूर असून वेगळ्या भूमिका घेत असल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे.

राज्यात महाआघाडी स्थापन झाल्यानंतर प्रथमच अहमदनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. त्यामुळे काँग्रेसने याच काळात गटनेता बदलला. या प्रक्रियेत आम्हाला विश्वासात घेतले नाही, असा आरोप शालिनी विखे यांनी केला आहे.

तसंच, मला एवढंच वाईट वाटतं की काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. प्रथम ठरवताना आम्हाला सर्व सहकार्‍यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आणि विश्वासात न घेता त्यांनी गट नेता बदलला त्याबद्दल दुमत नाही. परंतु, पुढच्या काळामध्ये जेव्हा आपण निवडून येतो. पक्षाच्या लोकांनी विश्वासात घेतलं असतं तर  त्याचा आनंद आम्हाला जास्त झाला असता, असंही शालिनी विखे म्हणाल्या.

एक महिला म्हणून सहनशीलता जास्त असते. ती सहन करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे, त्यामुळे तक्रार करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, शालिनी ताई यांच्या आरोपाला सत्यजित तांबे यांनी उत्तर दिलं. आशाताई दिघे यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर बैठकीची नोटीस सर्व सदस्यांना पोस्टाद्वारे कुरियरद्वारे आम्ही नोटीस पाठवली होती.  मुंबईमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेश कार्यालय मध्ये बैठक झाली आणि त्याच्यामध्ये नवीन गटनेता निवडल्या गेला होता, असा खुलासा तांबे यांनी केला.

तसंच, गेल्या लोकसभा निवडणुकीपासून आपण पाहतो आहे. त्या सातत्याने पक्षाच्या कार्यक्रमापासून आणि पक्षाच्या धोरणापासून वेगळी भूमिका घेत आहेत. त्यावेळेस मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो. त्यावेळेस शिवसेना भाजपच्या मदतीने मला पराभूत केलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की, त्या गोष्टीला फार गंभीर देण्याची आवश्यकता नाही, असं मत सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं.

मंत्रिपद न मिळाल्याने संग्राम थोपटेंच्या कार्यकर्तांनी फोडले कार्यालय

दरम्यान, मंञिमंडळ विस्तारात भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना डावलल्याने  भोर, वेल्हे,  मुळशी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. इतकंच नाही तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. भवनातील सर्व खुर्च्या आणि वस्तू कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत.

या पुढे या मतदारसंघात काँग्रेस पक्ष अस्तित्वात राहणार नाही तर संग्रामदादा थोपटे समर्थ म्हणून आम्ही काम करणार असल्याचे तीनही तालुक्यातील पदाधिका-यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. यापुढे भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी पाय ठेवल्यास त्यांचा जाहीर निषेध करण्यात येईल असंही भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनावणे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2019 06:53 PM IST

ताज्या बातम्या