मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Cabinet Expansion : शपथविधीला पहिला मान विखेंना, मुख्यमंत्र्यांच्या गटाला सहावा क्रमांक!

Cabinet Expansion : शपथविधीला पहिला मान विखेंना, मुख्यमंत्र्यांच्या गटाला सहावा क्रमांक!

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला आहे. राजभवनातील हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडत आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 09 ऑगस्ट : अखेर 39 दिवसांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार  (Maharashtra Cabinet Expansion) होत आहे. राजभवनामध्ये शपथविधी सोहळा सुरू झाला आहे.  एकूण 18 जण आज शपथ घेणार आहे. भाजपकडून पहिल्या पाच जणांनी शपथ घेतली आहे. तर सहाव्या क्रमांकावर शिंदे गटाचा नंबर लागला आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला आहे. राजभवनातील हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भावी मंत्र्यांना गोपनियतेची शपथ देत आहे.  या शपथविधी सोहळ्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली. तिसरा क्रमांक हा चंद्रकांत पाटील यांचा लागला आहे. पाटील यांनीही इश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली. त्यानंतर विजय कुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे संकटमोचक आणि फडणवीस यांचे खास असलेले गिरीश महाजन यांनी शपथ घेतली. सहाव्या क्रमांकावर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. त्यानंतर दादा भुसे यांनी शपथ घेतली. एकूण १८ मंत्री शपथ घेतील शिंदे गटाकडून हे मंत्री घेणार शपथ दादा भुसे संदीपान भुमरे गुलाबराव पाटील उदय सामंत शभुराजे देसाई तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर संजय राठोड भाजपकडून हे नेते घेणार शपथ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील विजयकुमार गावित सुरेश खाडे अतुल सावे मंगल प्रभात लोढा
First published:

पुढील बातम्या