राधाकृष्ण विखे-पाटील राजीनामा देणार? थोड्याच वेळात भूमिका करणार स्पष्ट

राधाकृष्ण विखे-पाटील राजीनामा देणार? थोड्याच वेळात भूमिका करणार स्पष्ट

पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे - पाटील राजीनाम्याची घोषणा करणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या मुलाला फोडत भाजपनं काँग्रेसला थेट आव्हान दिलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालं. त्यानंतर आता राधाकृष्ण विखे – पाटील पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे – पाटील काय बोलणार? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. शिवाय, विखे – पाटील आपल्या पदाचा राजीनामा देणार का? हे देखील पाहावं लागणार आहे.

डॉ. सुजय विखे – पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांना नगर लोकसभा मतदार संघातून तिकीट देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. राष्ट्रवादीनं काँग्रेसकरता नगरची जागा सोडण्यास नकार दिल्यानं सुजय विखे – पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सध्या अनेक राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. तर, गिरीश महाजन यांनी अनेक जण रांगेत असल्याचं सुचक वक्तव्य केलं आहे.

काँग्रेसला आणखी एक धक्का, राधाकृष्ण विखे-पाटील राजीनामा देणार?

काय म्हणाले अशोक चव्हाण?

आघाडीतील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसचे महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सुजय विखे – पाटील यांनी भाजपला हात दिला.त्यामुळे राधाकृष्ण विखे - पाटील काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. गांधी भवनात होणाऱ्या बैठकीत राधाकृष्ण विखे – पाटील राजीनामा देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर विचारले असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आजच्या मिटींगचा तो विषय नाही असं म्हणत या संपूर्ण प्रकरणावर अधिक बोलणं टाळलं.

VIDEO: पुण्यात भाजपची उमेदवारी कुणाला? काय म्हणाले गिरीश बापट

First published: March 14, 2019, 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading