बाळासाहेब थोरातांना विखेंचं थेट आव्हान, बालेकिल्ल्यातच उघडलं कार्यालय

बाळासाहेब थोरातांना विखेंचं थेट आव्हान, बालेकिल्ल्यातच उघडलं कार्यालय

बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्येच त्यांनी संपर्क कार्यालय थाटल्याने राजकीय संघर्ष चिघळणार आहे.

  • Share this:

हरीष दिमोटे, शिर्डी 11 ऑगस्ट : काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये एकमेकांचे सहकारी असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वर्चस्वाची लढाई आता तीव्र झालीय. भाजपमध्ये आल्यानंतर विखे यांना शह देण्यासाठी काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांना पुढे केलं आणि नंतर प्रदेशाध्यक्षपदही दिलं. विखेंनी आता थेट थोरातांना आव्हान दिलंय. बाळासाहेबांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्येच त्यांनी संपर्क कार्यालय थाटल्याने राजकीय संघर्ष चिघळणार आहे.

भाजपच्या आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चेला उधाण

बाळासाहेब थोरात यांच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर येथे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलंय. काँग्रेस मध्ये असतानाही या दोघांचे राजकीय युद्ध सुरू असल्याचं अनेकदा बघायला मिळालं. मात्र आता विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर हे युद्ध आणखी तीव्र झालंय. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात म्हणजेच संगमनेर शहरात सेना-भाजप युतीच्या जनसंपर्क आणि माहिती सुविधा केंद्राचे उदघाटन करण्यात आलं. यावेळी विखे यांनी नाव न घेता थोरात यांच्यावर टीकास्त्रही सोडलंय.

'हे जनरल डायरचे सरकार आहे का?' नवाब मलिक यांचा सरकारला सवाल...

महाराष्ट्रात वाताहात झालेल्या काँग्रेसला स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक महिन्याभरापूर्वीच काँग्रेसने केलीय. मात्र विखे पाटलांनी प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी सुरू केलीय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षीय थोरात विरोधक विखेंच्या छत्राखाली एकत्र आले आहेत. संगमनेर तालुका टँकर युक्त ठेवण्याचं थोरातांना भूषण असून  तालुका दुष्काळग्रस्त कसा राहील हे मॉडेल त्यांनी सांभाळलं असल्याची टीका विखे यांनी यांनी थोरातांवर केलीय.

तिनं राहत्या घरातच सुरू केला होता कुंटणखाना, मुली आढळल्या आक्षेपार्ह अवस्थेत

आता हे मॉडेल आऊट डेटेड झालंय त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून 'हम सब एक है' असा नारा देत विखेंनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे आता बाळासाहेब थोरात यांच्यापुढे विखे पाटील यांनी मोठं आव्हान निर्माण केलं असून थोरात त्याला कसं उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2019 08:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading