राधाकृष्ण विखे–पाटील यांच्या अडचणी वाढल्या; मंत्रिपदाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

राधाकृष्ण विखे–पाटील यांच्या अडचणी वाढल्या; मंत्रिपदाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मंत्रिपदाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, प्रफुल्ल साळुंखे, 18 जून : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. राधाकृष्ण विखे – पाटील यांना दिलेलं मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचं म्हणत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना राधाकृष्ण विखे – पाटील यांना मंत्रिपद का दिलं? याचं उत्तर सरकारनं द्यावं असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, यामुळे राजकीय भ्रष्टाचार बोकाळेल असं देखील सतीश आळेकर यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे भाजपनं गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. 17 जून रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्यपालांनी दिली शपथ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये एकूण 13 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गृहनिर्माण मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राधाकृष्ण विखेंना मंत्रिपदाची शपथ दिली.

अजित पवार यांचा सवाल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सभागृहात राधाकृष्ण विखे – पाटील यांना दिलेल्या मंत्रिपदाबाबत सवाल केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली होती. त्यानंतर आता सतीश तळेकर यांनी सरकारच्या या निर्णयाला थेट उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

या नेत्यांची मंत्रिपदी लागली वर्णी..

कॅबिनेट मंत्री

-राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

-जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)

-आशिष शेलार (भाजप)

-संजय कुटे (भाजप)

-सुरेश खाडे (भाजप)

-अनिल बोंडे (भाजप)

-तानाजी सावंत (शिवसेना)

-अशोक उईके (भाजप)

राज्यमंत्री

-योगेश सागर (भाजप)

-अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट)

-संजय (बाळा) भेगडे (भाजप)

-परिणय रमेश फुके (भाजप)

-अतुल सावे – भाजप

SPECIAL REPORT: FACEBOOK LIVE दोन भावांच्या जीवावर बेतलं, अपघाताने नागपूर हादरलं

First published: June 18, 2019, 8:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading