राधाकृष्ण विखे पाटलांचा भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला..PM मोदींच्या उपस्थितीत हाती घेणार 'कमळ'

राधाकृष्ण विखे पाटलांचा भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला..PM मोदींच्या उपस्थितीत हाती घेणार 'कमळ'

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे 12 एप्रिल रोजी जाहीर सभा आहे. या सभेत राधाकृष्ण विखे पाटील मोदी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल-  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश भाजपप्रवेश निश्चित झाला आहे.  भाजपचे उमेदवार  सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे 12 एप्रिल रोजी जाहीर सभा आहे. या सभेत राधाकृष्ण विखे पाटील मोदी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत. तर 17 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुज येथील सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार आहेत.

मुलांपाठोपाठ हे ज्येष्ठ नेतेही करणार भाजप प्रवेश 

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आधीच भाजप प्रवेश केला आहे. मुलांपाठोपाठ आता हे पितादेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे महाआघाडी मोठा धक्का मानला जात आहे.

नगरमध्ये भाजप Vsराष्ट्रवादी

सुजय पाटलांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत या मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.

विखे पाटील म्हणाले होते.. काँग्रेसच्या दुर्दशेला पक्षातलेच नेते जबाबदार

राज्यातल्या काँग्रेसच्या परिस्थितीला पक्षातलेच नेते जबाबदार आहेत. पक्षात कुरघोडीचं राजकारण असतं अशी कबुली विरोधीपक्ष नेते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती. न्यूज18 लोकमतच्या 'न्यूजरुम चर्चा' या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीने एक जागा सोडली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

विखे पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षात काय सुरू आहे याचा विचार पक्षातल्याच नेत्यांनी केला पाहिजे. सुजयने जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय आहे. त्याने पूर्ण जबाबदारीने तो निर्णय घेतला आहे. गेली तीन वर्ष तो या भागात काम करतो आहे. राष्ट्रवादीने सामंजस्य दाखवलं असतं तर आघाडीला झटका बसला नसता.

काँग्रेससाठी ही मोठी नामुष्की..

राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचं दिसून येत आहे. ही नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे. राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे यांना दक्षिण नगर मतदारसंघातून आघाडीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. आता राधाकृष्ण विखे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. ही बाब  म्हणजे काँग्रेससाठी मोठी नामुष्की असणार आहे. निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेतेपदावर असणाऱ्या व्यक्तीनेच पक्ष सोडल्याने कार्यकर्त्यांपर्यंत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.

एअर स्ट्राईक ते राफेल करार, मोदींची UNCUT मुलाखत

First published: April 10, 2019, 12:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading