मुंबई, 14 जून : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या भाजप प्रवेशावर सर्वांच्या नजरा आहेत. दरम्यान, भाजपमध्ये गेल्यानंतर राधाकृष्ण विखे – पाटील यांना कोणतं मंत्रिपद दिलं जाणार? यावर चर्चा सुरू आहे. पण, माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्यामुळे राधाकृष्ण विखे – पाटील यांचं मंत्रिपद हुकलं आहे. विश्वास नाही ना? राधाकृष्ण विखे – पाटील यांना मंत्रिपद दिल्यास नारायण राणे यांच्यावर अन्याय झाल्यासारखं होईल. त्यामुळे राधाकृष्ण विखे – पाटील यांना मंत्रिपद नको असं मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं. त्यामुळे राधाकृष्ण विखे – पाटील यांचं मंत्रिपद हुकलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे – पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. योग्य निर्णय होईल. चिंता नसावी असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखेंना दिला आहे. तर, अमित शहा यांनी विरोध केल्याच्या बातमीमध्ये तथ्य नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
राधाकृष्ण विखे – पाटील यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात विधिमंडळ नेतेपदी
विखे - पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित
लोकसभा निवडणुकीमध्ये नगरची जागा मुलगा डॉ. सुजय विखे - पाटील यांना न मिळाल्यानं राधाकृष्ण विखे - पाटील नाराज होते. डॉ. सुजय विखे - पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते विजयी देखील झाले. लोकसभा निवडणुकीदरम्यान राधाकृष्ण विखे - पाटील हे आघाडीच्या प्रचारापासून देखील लांब होते.
दरम्यान, आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर विखे - पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. लवकरच राधाकृष्ण विखे - पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मुसळधार पावसाचा धुमाकूळ; दरड कोसळून अनेक कारचा चुराडा