काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेलाय..विखे पाटलांची घणाघाती टीका

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेलाय..विखे पाटलांची घणाघाती टीका

पक्षात असतानाही शिर्डी लोकसभेत पक्षाच्या बॅनरवरून वगळले. आता विखेंशिवाय पर्याय नाही, म्हणून पुन्हा माझा फोटो लावलाय, असेही विखे पाटलांनी यावेळी सांगितले.

  • Share this:

शिर्डी, 24 एप्रिल- श्रीरामपूर येथे बुधवारी नाराज झालेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. करण ससाणे यांच्या समर्थकांनी विखें पाटील यांना पाठिंबा दिली. या मेळाव्यात काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना पाडण्यासाठी रणनीती आखण्यात आली. राधाकृष्ण विखे पाटील जे आदेश देतील त्यानुसार काम करणार असल्याचे ससाणे समर्थकांनी सांगितले.

करण ससाणे यांची बाबासाहेब थोरातांनी जिल्हाध्यक्षपदी लावलीय वर्णी लावली होती. मात्र, जयंत ससाणेंची ऐनवेळी साथ सोडणाऱ्या भाऊसाहेब कांबळेंना मदत न करण्याची ससाणे समर्थकांची भुमीका घेतली आहे.

काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेलाय

राधाकृष्ण विखेंना बाजूला सारून नेते होण्याची बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेलाय, अशा शब्दात विखे पाटलांनी घणाघाती टीका केली. पक्षात असतानाही शिर्डी लोकसभेत पक्षाच्या बॅनरवरून वगळले. आता विखेंशिवाय पर्याय नाही, म्हणून पुन्हा माझा फोटो लावलाय, असेही विखे पाटलांनी यावेळी सांगितले.

SPECIAL REPORT : मोदींच्या अराजकीय मुलाखतीचा राजकीय अर्थ काय?

First published: April 24, 2019, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading