राधाकृष्ण विखे पाटील यांची 'वर्षा' वारी, आता लक्ष भाजप प्रवेशाकडे

राधाकृष्ण विखे पाटील यांची 'वर्षा' वारी, आता लक्ष भाजप प्रवेशाकडे

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी त्यांची ही भेट झाली. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये जाणार, अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच ही भेट झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मे : माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी त्यांची ही भेट झाली. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये जाणार, अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच ही भेट झाली आहे.

अधिवेशनापूर्वी भाजप प्रवेश

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी शक्यता आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मंत्री होण्याआधी विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनीही सांगितलं.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते नगरमधून खासदार म्हणून निवडूनही आले. सुजय विखे यांच्यापाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा होती पण त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता.राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, असाही दबाव त्यांच्यावर होता. अखेर बऱ्याच दिवसांच्या चर्चेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.

भाजपची ताकद वाढली

राधाकृष्ण विखे पाटील यांचं पूर्ण घराणंच भाजपमध्ये आल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. आता विधानसभेच्या दृष्टीने राजकीय समीकरणं जुळवणाऱ्या भाजपसाठी विखे पाटलांचा भाजप प्रवेश अत्यंत महत्त्वाचा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था दारूण झाली आहे. अवघी एक जागा काँग्रेसला जिंकता आली आहे.

काँग्रेसला धक्का

सुजय विखे पाटील हे भाजपात गेल्याने राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात जातील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. आता सुजय विखे पाटील भाजपाच्या तिकिटावर निवडूनही आले आहेत. अशातच राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आणखी काही नेते भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी हा धक्काच मानला जातो आहे.

=====================================================================================

VIDEO : 'राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं असेल तर...', काय म्हणाले उदयनराजे?

First published: May 31, 2019, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading