नगरमध्ये सुजयचा किंवा आघाडीचा प्रचार करणार नाही- विखे पाटील

नगरमध्ये सुजयचा किंवा आघाडीचा प्रचार करणार नाही- विखे पाटील

सुजयच्या निर्णयाची नैतिक जबाबदारी माझी : राधाकृष्ण विखे-पाटील

  • Share this:

मुंबई, 14 मार्च: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात त्यांची वडील राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली.प्रत्येकाला व्यक्ती आणि विचारांचे स्वातंत्र्य आहे. पण नगरमध्ये मी सुजयचा तसेच आघाडीचा प्रचार करणार नाही असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले विखे-पाटील

- काँग्रेसने राष्ट्रवादीकडे नगरची जागा मागितली होती

- जास्त जागा जिंकाव्यात हेच यामागील गणित होते

- आघडीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न केला

- माझ्या मुलासाठी हा सर्व संघर्ष उभा राहिलाय, असं म्हणणं चुकीचं झालाय

- पवारांनी वडिलांबाबत केलेलं विधान दुर्दैवी. जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचे. पवारांनी अशा प्रकारे टिप्पणी करायला नको होती.

- काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे नगरची जागा मागितली होती.

- जास्त जागा जिंकाव्यात हेच या मागील गणित होतं.

- मी उत्तर हायकमांडला देईन.

- अहमदनगरमध्ये मी कोणाच्याच प्रचाराला जाणार नाही.

- पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य, सुजयचा भाजपप्रवेशाचा निर्णय वैयक्तिक होता.

- पक्ष घेईल तो निर्णय मान्य.

- आमच्या विखे कुटुंबाविरोधात त्यांच्या मनांत राग असेल तर प्रचार कशाला करायाला जावू?

- ज्यांना विश्वास नाही त्यांचा प्रचार करणार नाही.

- आघाडीचा धर्म पाळण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला

- सुजय विखेसंदर्भात काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटून भूमिका मांडणार. दोन-तीन दिवसात या विषयी बोलणे झाले की पुढील भूमिका मांडेन.

- हायकंमाडपेक्षा थोरात स्वतःला मोठे समजतात का?, जे काही सांगायचे आहे ते पक्षश्रेष्ठींना सांगेन.

- प्रत्येकाला व्यक्ति आणि विचार स्वातंत्र्य.

- आघाडीसाठी असं बोलणे योग्य नाही.

सुजय पासून ते शरद पवारांपर्यंत काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? UNCUT पत्रकार परिषद

First published: March 14, 2019, 1:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading