मुंबई, 14 मार्च : विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुलगा डॉ. सुजय विखे - पाटील यांच्या भाजप प्रवेशासह अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळेस विखे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वैयक्तिक विधानांमुळे दुखावला गेल्याचे वक्तव्य केले.
नगरच्या जागेवरुन हा सर्व संघर्ष माझ्या मुलासाठी उभा राहिला, असं बोलणं मुळात चुकीचे आहे. नगरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा सलग तीन वेळा पराभव झाला आहे. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसला मिळाली असती तर आघाडीची एक जागा वाढेल, हे त्यामागील गणित होतं, असे स्पष्टीकरण विखे-पाटील यांनी दिलं.
भाजपमध्ये अनेकांचे पत्ते कट, संधी मिळणारे 'ते' नवीन चेहरे कोण?
आणखी काय बोलले राधाकृष्ण विखे - पाटील?
दरम्यान, राधाकृष्ण विखे - पाटील आता राजीनामा देणार का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील असं उत्तर दिलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं.
काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे नगरची जागा मागितली होती. कारण, जास्त जागा जिंकाव्यात हेच यामागील गणित होतं, आम्ही आघाडीची धर्म पाळण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलासाठी हा सर्व संघर्ष उभा राहिलाय, असं म्हणणं चुकीचं आहे. शरद पवारांनी माझ्या वडिलांबाबत केलेलं विधान दुर्दैवी असून जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहबे. पवारांनी अशा प्रकारे टिप्पणी करायला नको होती. मुलानं केलेल्या भाजप प्रवेशावर मी उत्तर हायकमांडला देईन.तसेच अहमदनगरमध्ये मी कुणाच्याही प्रचाराला जाणार नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. सुजयचा भाजप प्रवेशाचा निर्णय वैयक्तिक होता. अशा शब्दात विखे - पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सुजय पासून ते शरद पवारांपर्यंत काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? UNCUT पत्रकार परिषद