जयंत पाटील यांच्यासमोर मराठा क्रांती मोर्चाचा राडा, सरकारविरुद्ध घोषणाबाजी

जयंत पाटील यांच्यासमोर मराठा क्रांती मोर्चाचा राडा, सरकारविरुद्ध घोषणाबाजी

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. जयंत पाटील राष्ट्रवादी भवनात येताच रमेश केरे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घुसून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

  • Share this:

औरंगाबाद,7 मार्च:राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. जयंत पाटील राष्ट्रवादी भवनात येताच रमेश केरे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घुसून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. घोषणाबाजीमुळे काही काळ जयंत पाटील यांना आपले भाषण थांबवावं लागलं. हे सरकार मराठा समाजाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रमेश केरे पाटील यांनी यावेळी केला.

काय म्हणाले जयंत पाटील..?

जयंत पाटील यांनी सांगितलं की, पश्चिम वाहिनी नद्यांमधून मराठवाड्यासाठी पाणी आणण्याचा निर्णय रद्द झाला नाही आहे. सगळं सर्वेक्षण केल्यानंतरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे. काम सुरू आहे. 7 टीएमसी पाणी आपण गोदावरीत आणणार आहोत. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करणं सुरु आहे. स्टॅम्प ड्युटी कमी करणे हा एक प्रयोग आहे. बघू या कसा निकाल येतो. त्यानंतर इतर शहरांचाही विचार करता येईल. कृष्णा-मराठवाडा बोगद्याच्या काम सुरु आहे. या कामासाठी 850 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणून मराठावाड्याला पाणी द्यायचं आहे. यावर्षी बोगद्याच्या काम होईल, यातून मराठवाड्याला 7 टीएमसी पाणी मिळेल.

अयोध्येला आमचे लोक गेले का हे माहीत नाही. रामाच्या दर्शनाला त्यांनी जावं. ज्याला रामभक्ती आहे श्रद्धा आहे, वेळ आहे, आणि रामाचा विषय आता राजकीय नाही. हा आता श्रद्धेचा विषय आहे.शहरचे नाव बदलणार का, तर जर तर वर मी बोलणार नाही. विमानतळ नाव बदलले आहे, जनतेने या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

हेही वाचा...मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने पाडले पत्नीचे 4 दात, रॉकेल टाकून पेटवण्याचाही प्रयत्न

अर्थसंकल्पाचा मराठा क्रांती मोर्चाने केला निषेध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केला. मात्र, अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा औरंगाबाद येथे निषेध करण्यात आला. राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला फसवलं आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. अर्थसंकल्पात मराठा समाजाच्या मागण्याचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने अर्थसंकल्पाचा निषेध करण्यात आला आहे.

हेही वाचा..काँग्रेसच्या नेत्यांचही ‘जय श्रीराम’, उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येत घेणार रामलल्लांचं दर्शन

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. शिवस्मारक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी सारख्या योजनांसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. या सरकारने फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला सक्षमीकरण, उद्योगाला चालना आणि पर्यटन विकासावर महाविकास आघाडी सरकारनं भर दिला आहे. यासोबतच राज्यात बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मिती करण्यावर आणि स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.

First published: March 7, 2020, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading