मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'रात कली एक ख्वाब में आई...' जयंत पाटलांनी गायलं गाणं, VIDEO

'रात कली एक ख्वाब में आई...' जयंत पाटलांनी गायलं गाणं, VIDEO

 'बुढ्ढा मिल गया' चित्रपटातील 'रात कली एक ख्वाब में आई, और गले का हार हुई' हे गाणं जयंत पाटील यांनी गाऊन उपस्थितांची मन जिंकली.

सांगली, 06 जानेवारी:  राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचा आपल्या वेगळ्या अंदाजामुळे कायम चर्चेत असतात. आता एका लग्न सोहळ्यात चक्क गाणं गात असताना जयंत पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोल्हापूरमध्ये जयंत पाटील यांच्या पुतण्याचा लग्न सोहळा पार पडला.  लग्नसोहळ्या पूर्वी हळदीच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी जयंत पाटील यांनी किशोर कुमार यांचे एक गाणे गायले. 'बुढ्ढा मिल गया' चित्रपटातील 'रात कली एक ख्वाब में आई, और गले का हार हुई' हे गाणं जयंत पाटील यांनी गाऊन उपस्थितांची मन जिंकली. हा लग्न सोहळा शहरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडला. जयंत पाटील यांच्या गाण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या नातेवाईक आणि समर्थकांनी जयंत पाटलांचं कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये एका चिमुरड्यासोबत जयंत पाटील यांचा फोटो चर्चेचा विषय ठरला होता.  'मला तुमचा फोटो काढायचाय...' असं वाक्य एका लहानग्याचं कानी पडताच जयंत पाटील यांनी तात्काळ पोझ दिली आणि 'नीट काढलास ना रे फोटो' असं म्हणून त्याचे कौतुक करत त्याच्या या धाडसाला शाबासकीही दिली. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे मंत्री जयंत पाटील यांचा दौरा होता. यावेळी 6 वर्षाचा रुद्र सागर जंगम या लहानग्यानं राज्याचे जयंत पाटील यांचा फोटो मोबाईलमध्ये काढण्याचा आग्रह धरला आणि लहानग्याचा हट्ट पुरवण्यासाठी जयंत पाटील यांनीही लगेच पोझ दिली.
First published:

Tags: Jayant patil, NCP, जयंत पाटील, राष्ट्रवादी

पुढील बातम्या