निझामुद्दीनमध्ये तबलिगींच्या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी? अमित शहांना सवाल

निझामुद्दीनमध्ये तबलिगींच्या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी? अमित शहांना सवाल

देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनाच सवाल केला आहे.

  • Share this:

मुंबई, 8 एप्रिल: देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनाच सवाल केला आहे. दिल्लीतील निझामुद्दीन येथे तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशी, असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या लेटर हेडवर केंद्र सरकारला पत्र लिहून हा सवाल केला आहे. मात्र, अनिल देशमुख यांनी सवाल उपस्थित केला असला तरी त्यांनी पत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नामोल्लेख टाळला आहे.

हेही वाचा.. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या इतकी कशी वाढली? उद्धव ठाकरे म्हणतात...

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिल्लीत निझामुद्दीन तब्लिगी कार्यक्रम परवानगी कशी दिली? महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबत परवानगी नाकारली होती. मग केंद्राने कशी काय परवानगी दिली, असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थितीत केला आहे.

मरकज कार्यक्रम जिथं झाला, तेथील पोलिस स्टेशनने हा कार्यक्रम का थांबवला नाही? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्या रात्री उशीरा मरकज येथे का गेले? तिथ दिल्ली पोलिस अधिकारी का नाही गेले, असे अनेक सवाल आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थितीत केले आहेत.

हेही वाचा.. 3 महिन्यांचा EMI थांबवण्यासाठी मागितला जातोय OTP, पोलिसांचं 'अलर्ट' राहण्याचं आवाहन

दिल्ली पोलिस आयुक्त आणि अजित डोवाल अजूनही या मुद्द्यावर भाष्य का करत नाहीत, तसेच अजित डोवाल यांना भेटल्यानंतर मरकज मौलाना हे कुठे गायब झाले असा सवाल ही अनिल देशमुख यांनी उपस्थितीत केला.

घराबाहेर पडताना या गोष्टी अत्यावश्यक अन्यथा होईल अटक

मुंबईत कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतो आहे. दररोज रुग्णांची संख्याही वाढत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आता आणखी कठोर नियम लागू केला आहेत. घराबाहेर पडताना आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणं अत्यावश्यक केलं आहे. मास्क नसेल तर पोलिस तुम्हाला अटकही करू शकतात, असा नियमच महापालिकेने केला आहे.

हेही वाचा..आरोग्यसेवेची 4 भागांत विभागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

त्याबाबतचं पत्रक आज काढण्यात आलं. हा मास्क 3 पदरी पाहिजे. तो घरी तयार केलेला असला तरी चालणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आता घबरदारी घेणं बंधनकारक ठरणार आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 8, 2020, 3:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading