मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'भाजप आमदारांना क्वारन्टाइन करा', शिवसेनेच्या मागणीनंतर कोकणात राजकारण तापलं

'भाजप आमदारांना क्वारन्टाइन करा', शिवसेनेच्या मागणीनंतर कोकणात राजकारण तापलं

कोरोनावरुन कोकणात सेना भाजपामधील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.

कोरोनावरुन कोकणात सेना भाजपामधील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.

कोरोनावरुन कोकणात सेना भाजपामधील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.

सिंधुदुर्ग, 21 मे : विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप आमदारांच्या कोकण दौऱ्यावरुन सेना भाजपामध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यानी रेड झोनमधून आलेल्या भाजप आमदारांनी आधी स्वत: क्वारंन्टाइन व्हावे आणि मगच कोकणात फिरावे अन्यथा कोकणात कोरोना फैलावाचा धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्याला उत्तर देताना दरेकर यांनी राज्यात दौरे करणाऱ्या गृहमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांना आधी क्वारन्टाइन करा, मगच भाजपाबध्दल बोला, असं सामंत यांना सुनावलं आहे. त्यामुळे कोरोनावरुन कोकणात सेना भाजपामधील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.

दुसरीकडे, आम्ही भाजपचे पाच विधानपरिषद आमदार कोकणातल्या कोरोना टेस्ट लॅबसाठी प्रत्येकी वीस लाख रुपये द्यायला तयार आहोत. पण लॅब सुरु करुन दाखवा, असं जाहीर आव्हानही भाजपने सरकारला दिलं आहे.

प्रवीण दरेकरांचे आक्षेप

प्रवीण दरेकर आणि भाजपाचे सहा सहकारी आमदारांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करत कोरोनावरच्या उपाययोजनांची प्रशासनाकडून माहिती घेतली आणि त्यानंतर त्यानी पत्रकारांशी संवाद साधला

1: दरेकरांच्या म्हणण्यानुसार कोकणात जे मुंबईकर आलेले आहेत त्यांना त्यांच्या गावात ज्या ठिकाणी क्वारन्टाइन करण्यात आलेले आहे तिथे प्रशासनाने पुरेशा सुविधाच दिलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांचे हाल होत असून गावागावात गावकरी आणि मुंबईकर यांच्यात वाद होत आहेत.

2: मुंबईकरांना खरंतर एसटीच्या गाड्यांनी कोकणात मोफत सोडणे आवश्यक होते. पण कोकणचेच सुपुत्र असलेले परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतीत काहीच हालचाल केली नाही .

3: सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांचे प्रमाण पाहता कोरोना चाचणी लॅब तातडीने उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील हॉस्पिटलची मदत घेण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. आम्ही भाजपचे पाच विधानपरिषद आमदार प्रत्येकी वीस लाख रुपये या टेस्ट लॅब साठी देण्यास तयार आहोत सरकारने तातडीने लॅब सुरु करावी .

या प्रमुख मागण्या करत दरेकर यानी हे सरकार कोरोनाबाबतच्या उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी झाल्याची टीका केली .

कसे फुटले वादाला तोंड?

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी 20 मे ला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा दौरा केला. यावेळी त्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री असलेले अनिल परब रत्नागिरीत फिरकतच नाहीत तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी प्रशासनात लुडबूड करुन दबाव टाकतात अशी विधाने दरेकर यांनी केली . तसंच मुंबईकरांना कोकणात जाऊ नका असं सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईकर कोकणवासियांचा अपमान केला अशी टीकाही दरेकर यानी मुख्यमंत्र्यांवर केली.

त्यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दरेकर यांना प्रत्त्युतर दिले . लॉकडाऊननंतर 55 दिवसांनी कोकणची आठवण झालेल्या विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका न करता आधी रेड झोन मधून आल्यामुळे स्वत:ला क्वारन्टाइन करुन घ्यावे, अन्यथा कोकणात कोरोनाचा धोका वाढेल असा आरोप भाजपाच्या आमदार दौऱ्यावर केला. त्याला पुन्हा दरेकर यानी उत्तर दिल्यामुळे हा रजकीय वाद आणखी काही दिवस सुरु राहणार आहे . मात्र या वादात कोकणवासियांच्या आरोग्याबाबत कोणताच पक्ष गंभीर नसल्याचं दिसून येत आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published:
top videos