Home /News /maharashtra /

'तुफानी करते है' अजगर पोहोचला 70 फूट उंच विजेच्या टॉवरवर, 7 तासांच्या थरारक रेस्क्युचा VIDEO

'तुफानी करते है' अजगर पोहोचला 70 फूट उंच विजेच्या टॉवरवर, 7 तासांच्या थरारक रेस्क्युचा VIDEO

70 फूट उंचावर जाऊन हा अजगर जाऊन बसला होता पण आता त्याला खाली ही उतरता येत नव्हते.

    गणेश दुडम, प्रतिनिधी खोपोली, 07 जुलै: पावसाळ्याचा दिवसांमध्ये सापाचे दर्शन होत आहे. पण, खोपोलीमध्ये (khopoli) एकच वेगळीच घटना घडली. तब्बल 70 फूट उंच विजेच्या टॉवरवर एका अजगराने (Python) ठाण मांडलं होतं. ही बाब समोर येताच सर्पमित्र आणि अग्निशमन दलाने जीवाची बाजी लावून या अजगराला वाचवलं. 70 फूट उंचावर अजगर पोहोचला कसा, याचे आश्चर्य सर्वांना वाटत आहे. खोपोलीलीतील महिंद्रा सॅनियो कंपनीच्या पॉवर स्टेशन 100 KV एक लाख विद्युत प्रवाह असलेल्या टॉवरवर अजगर फसला होता. तब्बल ७० फूट उंचावर जाऊन हा अजगर जाऊन बसला होता. त्यामुळे त्याला धडखाली ही उतरता येत नव्हते. ही बाब कंपनीच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर आणि सुनील पुरी यांना याची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र आणि खोपोली अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी ज्या टॉवरवर अजगर चढला आहे, त्याच्या समोरील ट़ॉवरवर चढून पाण्याचा मारा केला, त्यानंतर खाली जाळी पसरवून अजगराला पकडण्यात आले. सात तासाच्या अथक प्रयत्नाने या अजगरालाा जीवदान देण्यात कंपनी व्यवस्थापक खोपोली अग्निशामक दल आणि सर्पमित्रांना यश आलं. या रेस्क्यू दरम्यान अनेकवेळा कंपनीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. एका जीवाची काय किंमत असते ते या रेस्क्युवरून दिसून आले. प्लास्टिकच्या पाईपमध्ये अर्धवट अडकलेल्या अजगराला दिलं जीवदान दरम्यान, मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत हायको कंपनीच्या शेजारी सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम क्षेत्रात कामगारांना अजगर दिसताच कामगारांची बोबडी वळाली. लगेच सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं सर्पमित्र सुनील पुरी आणि योगेश औटी अजगराला सुरक्षित पकडले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या सरपटणाऱ्या वन्यजीवाच्या शरीरात पीव्हीसी पाईपची रिंग अडकली होती. त्यामुळे त्याच्या हालचालीवर परिणाम झालेला दिसून येत होता. या सर्पमित्रांनी या पाईपची रिंग काढण्याचा निर्णय घेतला. अजगर आकाराने भला मोठा होता त्यात ती रिंग कमी आकाराची असल्याने त्याच्या अंगात रूतून बसली होती. रिंग काढत असताना त्याला जखम होण्याची शक्यता होती मात्र अत्यंत सावधपणे ती रिंग कापून काढली आणि अजगराला त्या पाशातून मुक्त केले. या अवस्थेत अजगराला आपले भक्ष्य गिळणेही शक्य होत नसावे. प्राणीमात्रांच्या अधिवासात मानवाने अतिक्रमण केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. त्यात अन्न पाणी शोधण्याच्या नादात जशा गाय वासरांच्या पोटात प्लॉस्टिक पिशव्या जात असतात त्याच प्रमाणे हा अजगर त्या पाईपाच्या रिंग मधे अडकला असावा सर्पमित्रांच्या प्रयत्नाने अजगराला जीवदान मिळाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या